शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

खासदारांव्दारे विहिगांवच्या सोयीसुविधांचा लोकार्पणसोहळा; केंद्रीय मंत्री अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 7:18 PM

सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत पहिल्या टप्यात शहापूरच्या विहिगांव या अतिदुर्गम भागातील व डोंगर पठारावरील गावाची निवड सहस्त्रबुध्दे यांनी केली आणि त्याचा विकास साधला. दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आणि आता हे गाव जगाच्या संपर्कात आले. कृषीच्या आत्मा योजनेव्दारे ५० एक शेतीमध्ये शेंद्रीय तांदूळ उत्पादन घेण्यात आले आदी ६८ विकास कामांच्या आराखड्याव्दारे या गावाचा विकास सहस्त्रबुध्दे यांनी साधला.

ठळक मुद्दे६८ विकास कामांच्या आराखड्याव्दारे या गावाचा विकासपरिसरातील शेतीमधून २०२२पर्यंत कसे दर्जेदार उत्पादन घेता येईल, त्याविषयीची पत्रिका शेंद्रीय शेतीचे रिपोर्टकार्ड शेतकऱ्यांना वाटप नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर

ठाणे : सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांनी शहापूर तालुक्याच्या दुर्गमभागातील् विहिगांव दत्तक घेतले आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग या गावास शनिवारी भेट देणार होते. अखेर त्यांच्या अनुपस्थितीत विहिगावच्या सोयी सुविधांचा लोकार्पण सोहळा सहस्त्रबुध्दे यांच्यासह खासदार कपील पाटील, ग्रामविकास समाजसेवक पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.या सोयीसुविधांच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी सुमारे वीस दिवस आधी ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. केंद्रीय ग्राम विकास मंत्र्या उपस्थितीत हा सोयीसुविधा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. पण काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकले नाही. यामुळे या गावातील विकास कामाच्या समारोप व सोयीसुविधांचे लोकार्पण आज करण्यात आले. सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत पहिल्या टप्यात शहापूरच्या विहिगांव या अतिदुर्गम भागातील व डोंगर पठारावरील गावाची निवड सहस्त्रबुध्दे यांनी केली आणि त्याचा विकास साधला. दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आणि आता हे गाव जगाच्या संपर्कात आले. कृषीच्या आत्मा योजनेव्दारे ५० एक शेतीमध्ये शेंद्रीय तांदूळ उत्पादन घेण्यात आले आदी ६८ विकास कामांच्या आराखड्याव्दारे या गावाचा विकास सहस्त्रबुध्दे यांनी साधला.योगायोगाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यावेळी येथे उत्पादीत केलेले शेंद्रीय तांदूळ सॅम्पलचे वाटप करण्यात आले. लॅबव्दारे तयार केलेले येथील शेंद्रीय शेतीचे रिपोर्टकार्ड शेतकऱ्यांना वाटप केले. या परिसरातील शेतीमधून २०२२पर्यंत कसे दर्जेदार उत्पादन घेता येईल, त्याविषयीची पत्रिका यावेळी संबंधीत शेतकऱ्यांना दिल्याचे आत्मा प्रकल्प संचालक पी.एम.चांदवडे यांनी लोकमतला सांगितले. याशिवाय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाव्दारे अवजारे बँकेव्दो महिला बचत गटाना साहित्य वाटप केले. पावरट्रीलर, ट्रॅक्टर, कापणी यंत्राचे वितरण केले.यावेळी पोपटराव पवार यांनी ग्रामीण उत्पानावर आधारीत उद्योगधंदे व विकास याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक भीमनवार, विभागीय कृषीसहसंचालक विकास पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक माने,कृषीविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे आदींसह गावकरी मोठ्यासंख्येने उपस्थित हाते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षा रोपण कार्यक्रम पार पडला. तर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये शेतकरी दिन उत्साहात साजरा झाला. महिला बचतगट मळाव्यांसह विविध कार्यक्रम पार पडले. शेती उत्पादनासह योजनांची यावेळी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी