घ्या खबरदारी! कोरोनाबाबत नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 05:26 PM2021-02-24T17:26:48+5:302021-02-24T17:27:48+5:30

Corona Rules Violation : उल्हासनगर महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी - आयुक्त दयानिधी

Violation of the rules regarding corona will result in criminal charges | घ्या खबरदारी! कोरोनाबाबत नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार 

घ्या खबरदारी! कोरोनाबाबत नियमाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार 

Next
ठळक मुद्देदेशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना उल्हासनगर महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी झाल्याचा दावा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी केला.

सदानंद नाईक
 

उल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिका प्रशासन यशस्वी झाले असून मास्क न वापरणाऱ्यावर पहिली दोन व दुसरीवेळ दंडात्मक कारवाई तर तिसऱ्यांदा थेट एफआरआय दाखल करण्याचे संकेत आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी दिले. तसेच प्रसिद्धपत्रक काढून नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान महापौर, उपमहापौर, अतिरिक्त आयुक्त यांनीही पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना उल्हासनगर महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी झाल्याचा दावा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी केला. त्यांनी मंगळवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेवर, येथील पत्रकारांनी बहिष्कार टाकल्याने, त्यांनी प्रसिद्धपत्रक काढून नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले. गेल्या दोन दिवसात १३ व १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून शांतीनगर येथील २०० बेडच्या साई प्लॅटिनियम रुग्णालयाला कोविड रुग्णालय घोषित केले. रुग्णालयात तब्बल ६९ बेड आयसीयू आहेत. महापालिकेने घातलेल्या नियमाचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन आयुक्तांनी करून मास्क व सोशल डिस्टन्स न ठेवल्यास प्रथम २००, दुसरी वेळ ५०० तर तिसरी वेळ थेट एफआरआय कारवाईचे आदेश दिले.

शहरातील दुकाना समोर फक्त ५ ग्राहक उभे राहतील याची काळजी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम २ हजार, दुसरीवेळ ५ हजार तर तिसरी वेळ थेट एफआरआय अथवा दुकान कायम बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. लग्नाचे हॉल, लॉन्स, बंदिस्त सभागृह व खुले मैदान यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम २० हजार दंडात्मक कारवाई तर दुसरी वेळ सीलबंदीची कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २ हजार दंड अथवा गुन्हा दाखल करण्याचा बडगा आयुक्तांनी उगारला आहे. लग्न व इतर सभारंभास जास्तीत जास्त ५० तर अंत्यविधीसाठी २० नागरिकांची मर्यादा घालून देण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व तंबाखू सेवनास बंदी घालण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान मंगळवारी महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर व शिवसेना शहरप्रमुख यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन कोरोना काळात नियमांची माहिती देऊन नियम पाळण्याचे आवाहन केले.


महापालिका लॅबमध्ये २४ तास कोरोना चाचण्या

महापालिकेने गेल्या दोन महिन्यांपूर्वी अत्याधुनिक लॅबचे उदघाटन करून कोरोनासह इतर चाचण्या करण्यात येईल. असे आश्वासन आयुक्तांनी उद्घाटनाच्यावेळी दिले होते. आज २४ तास कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती महापालिका वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली. तसेच कोविड रुग्णालय साई प्लॅटिनियमसह आयटीआय, तहसील, रेड क्रॉस येथील आरोग्य केंद्र सज्ज असल्याची माहिती देऊन टाटा आमंत्रण सज्ज असल्याचे सांगितले. 

Web Title: Violation of the rules regarding corona will result in criminal charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.