शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:53 PM

स्मशानभुमीच्या निमित्ताने सध्या ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परंतु आता स्मशानभुमीच्या बाजूने तब्बल पाच रहिवाशांना रस्त्यावर उतरून सरनाईक यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देस्मशानभुमीच्या मागणीसाठी पाच रहिवासी रस्त्यावरलवकरच पाहणी दौरा केला जाणार

ठाणे - मागाली काही दिवसापासून स्मशानभुमीच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. परंतु सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी या स्मशानभुमीच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार रहिवासी सहभागी झाले होते. हा मोर्चा जरी नागरिकांचा असला तरी, या मोर्चाच्या माध्यमातून सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.                मागील काही महिन्यांपासून ठाण्यात स्मशानभुमीच्या मुद्यावर चांगलेच वादळ उठले आहे. परंतु आता हे वादळ एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये रंगत असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी विधिमंडळात उपस्थित केलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व टिकुजीनी वाडी येथील मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते नरेश म्हस्के व नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर या दोन्ही स्मशानभूमी संदर्भातील ठराव मंजुर झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अभियंत्यांनी या स्मशानभूमीसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.       परंतु या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम चालु असलेल्या काही बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबरोबर असल्याने या परिसरातील काही मुठभर रहिवांशाना हाताशी धरून काही नगरसेवक या स्मशानभूमीला विरोध करू लागले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. परंतु याच स्मशानभुमीला त्यांच्याच पक्षातील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी विरोध केल्याने स्मशानभुमीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हावाट्यावर  आला आहे.        स्मशानभूमीच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वाजता ठाणे महापालिका शाळा क्र .४७ वर्तक नगर ते महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे स्मशानभूमी बचाव समितीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वर्तकनगर येथून निघालेला मोर्चा दुपारी साडेबारा वाजता महापालिका मुख्यालयाच्या बाहेर आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमवेत स्मशान बचाव समितीने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. समता नगर ते टिकुजिनीवाडी या परिसरात गेल्या ८ ते १० वर्षात अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या पट्ट्यात एकही स्मशानभूमी नाही. केवळ वागळेला स्मशानभूमी आहे. त्यामुळे स्मशानभूमीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. तर हा नागरिकांचा मोर्चा असून यात पक्षाचा काही संबंध नसल्याची प्रतिक्र या आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या १९ तारखेला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून निसर्ग उद्यान मुल्ला बाग येथील आरक्षित जागेचा पर्याय सुचवण्यात आला असून दोन महिन्यात स्मशानभूमीच्या कामाला सुरु वात करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMorchaमोर्चा