शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Vidhan sabha 2019: शिवसेनेकडून ठाण्यात स्वबळाची तयारी, दोन आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 6:12 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.

- अजित मांडके

ठाणे : नवरात्रीत शिवसेना आणि भाजपच्या युती बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, युती झाली किंवा नाही, तरी ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी गेल्या 9 महिन्यांपूर्वीपासूनच स्वबळाची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी भाजपचा आमदार असेल, त्या ठिकाणी शिवसेनेत इच्छुकांची चाचपणीही आली असून या माध्यमातून भाजपवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले आहेत. परंतु, युती तुटली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सर्व्हेत समोर आली आहे. त्यामुळे स्वबळाची तयारी असली तरी विद्यमान आमदारांना फुटण्यापासून वाचविण्याचे आव्हानही पक्षासमोर आहे.युतीबाबत शिवसेना आणि भाजपकडून अद्यापही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. त्यात काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्याचा विचार केल्यास ठाणे शहर विधानसभा क्षेत्र मिळावे, यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. मात्र, युती तुटलीच तर या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल, हे नावही अंतिम झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, युती झाली तरीही ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचे प्रयत्न असून त्या बदल्यात दोन वर्षांनी लागणाऱ्या विधानपरिषदेची जागा सोडण्यास पक्ष तयार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली. त्यामुळे भाजपने ही जागा सोडल्यास विद्यमान आमदार संजय केळकर यांचे विधानपरिषदेवर  केले जाणार आहे.

दुसरीकडे, मागील वेळेस शिवसेना गाफील राहिल्याने, शिवसेनेला ऐन वेळेस स्वबळावर निवडणूक लढवून उमेदवारांची शोधाशोध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीत पक्षातील प्रत्येक उच्चपदस्थ सदस्याबरोबर साध्या कार्यकर्त्याला देखील गाफील न राहण्याचा सल्ला देण्यात आला असून गेल्या नऊ महिन्यांपासूनच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी काहींचा प्रवेशही लांबणीवर टाकला आहे. युती तुटली तर अशा आपल्या पक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी देण्याची तयारीही जिल्ह्यातील काही मतदारसंघात सुरु आहे. शिवाय, काही इच्छुकांना आधीपासूनच तयारी करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील काही मतदारसंघातील उमेदवार देखील शिवसेनेकडून अंतिम झाले आहेत. मात्र, युती तुटली तरच त्यांची नावे घोषित केली जाणार असल्याची माहितीही शिवसेनेच्या सुत्रांनी दिली. ज्या ठिकाणी जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा दिसत आहे, त्याठिकाणी कुरघोडीचे राजकारण खेळण्याची रणनितीसुद्धा शिवसेनेने आखली होती. त्यानुसार ठाण्यासह जिल्ह्यातील अशा काही मतदारसंघात त्याचे पडसादही मागील काही महिन्यात उमटल्याचे दिसून आले.

संभाव्य फुटीमुळे शिवसेना सावधएकीकडे युती तुटली तर स्वबळाची तयारी शिवसेनेने केली असली तरी त्यांच्याच पक्षातील काही विद्यमान आमदार फुटण्याची शक्यताही त्यांना सतावत आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे ६ आमदार आहेत, तर भाजपचे सात आणि एक अपक्ष असे आठ आमदार आहेत. त्यात युती तुटली तर शिवसेनेचे दोन आमदार वेगळा घरोबा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दोघांचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंशी फारसे पटत नाही. ते फुटल्यास ‘ग्रामीण’ भागातही भाजपाचे ‘कल्याण’ होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या नेत्यांना असा ‘प्रताप’ करणाऱ्यांची नावे सुद्धा माहीत आहेत, त्यामुळे हे दोन्ही आपले नव्हतेच म्हणून त्यांनी तयारी स्वबळाची ठेवली असली तर उद्या जर ते फुटून भाजपत जावून निवडून आले तर शिवसेनेचा जिल्ह्यावरील वरचष्मा कमी होऊन भाजपचे जिल्ह्यात १० आणि शिवसेनेचे चार आमदार निवडून येण्याची चिंता पक्षाला सतावत आहे. हे पचविता न येण्यासारखे असल्यामुळे शिवसेनेने सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणेvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019