Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 03:38 PM2021-04-19T15:38:25+5:302021-04-19T16:56:18+5:30

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईँटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे

Video: mayur shelake is the only source of survival for me, said the blind mother of vangni railway station | Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव

Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव

googlenewsNext
ठळक मुद्देआमचं हातावरच पोट असल्यानं काम करणं जरुरी असतं. त्यासाठीच मी प्लॅटफॉर्मवर चालत होत, मात्र चालता-चालता माझा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला, त्यावेळी त्याला बाहेर काढायला कुणीही नव्हतं.

नवी दिल्ली : वांगणी रेल्वे स्थानकावरील पॉइंटमनने प्रसंगावधानता दाखवत एका अंधमातेच्या चिमुकल्‍याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. मयूर शेळकेंच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मयूर यांच्या बहादूर कामगिरीला सॅल्यूट करण्यात येत आहे. आता, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक करुन फोनवरुन त्याच्याशी संपर्क साधला. 

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईँटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. तर, दुसरीकडे ज्या अंध मातेच्या बाबतीत ही घटना घडली त्या मातेनंही मयूरच्या धाडसाचं कौतुक केलंय. मयूर शेळकेमुळेच आज माझा मुलगा माझ्याजवळ आहे. मयूर यांना एखादा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी संगिता शिरसाट या अंध मातेनं केलीय. 

आमचं हातावरच पोट असल्यानं काम करणं जरुरी असतं. त्यासाठीच मी प्लॅटफॉर्मवर चालत होत, मात्र चालता-चालता माझा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला, त्यावेळी त्याला बाहेर काढायला कुणीही नव्हतं. तितक्यात एक्सप्रेस गाडी आली होती, पण झेंडवाल्या मयूर शेळकेनं स्वत:चा जीवा धोक्यात घालून आमच्या मुलाचा जीव वाचवला. माझा एकमेव आधार मयूरमुळेच जिवंत राहिला. त्यामुळे, मयूरला पुरस्कार द्यावा, अशी मागणी मयूरच्या आईने केली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन मयूर शेळकेंचा सन्मान करणार असल्याचं म्हटलंय. 

रेल्वेमंत्र्यांकडून पुरस्काराची घोषणा

"आज रेल्वेमॅन मयूर शेळके यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. संपूर्ण रेल्वे कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे. एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला. मला रेल्वेकडून खुप काही मिळालं आहे. मी केवळ माझी जबाबदारी पार पाडली असं त्यांनी सांगितलं," अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली. "त्यांच्या या शौर्याची आणि कामाची कोणत्याही पुरस्काराशी किंवा पैशाशी तुलना केली जाऊ शकत नाही. परंतु आपलं कर्तव्य पार पाडणं आणि आपल्या कामातून मानवतेबद्दल प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल," असं गोयल म्हणाले. 

मुलाला वाचवण्याचा निर्धार केला 

स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोन दिवसांपूर्वी घडलेला संपूर्ण थरार सांगितला. 'शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलीला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणं गरजेचं आहे असा निर्धार मी मनाशी केला आणि जिवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेनं धावत सुटलो,' असं शेळके यांनी सांगितलं. समोरून येणारी एक्स्प्रेस पाहून मला भीती वाटली होती. पण त्या मुलाला वाचवायचंच असा निश्चय मी केला होता आणि त्याला वाचवण्यात यशस्वी ठरलो, अशा शब्दांत शेळकेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सध्या सर्वांकडून माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सगळे माझ्या हिमतीला दाद देत आहेत. हे पाहून आनंद वाटत असल्याचं शेळके म्हणाले. 

तुम्ही मुलाला सुखरुप वाचवलं त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. तुम्ही ते पाहिलं का, असा प्रश्न शेळके यांना विचारण्यात आला. त्यावर मी ते सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. तो प्रसंग अतिशय चित्तथरारक आहे. त्यावेळी तो मुलगा माझ्यापासून ५० ते ६० मीटर अंतरावर होता. मी त्याच्यापर्यंत धावत पोहोचलो. त्याला उचलून फलाटावर ठेवलं आणि नंतर मीदेखील लगेच फलाटावर उडी घेतली. त्यानंतर दोन सेकंदात तिथून गाडी गेली, अशा शब्दांत शेळकेंनी घडलेला थरारक प्रसंग सांगितला.
 

Web Title: Video: mayur shelake is the only source of survival for me, said the blind mother of vangni railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.