भिवंडी : भाजपाचे आमदार महेश चौघुले व माजी महापौर विलास पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. विलास पाटील समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे.
पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, मात्र परीसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये वाद काय?
महापालिका निवडणुकीत प्रभाग एकमध्ये भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले हा आणि माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होते.
पाटील यांनी चौघुले यांचा पराभव केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच या दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे घटना घडल्या होत्या.
असे काय घडले की वाद वाढला?
रविवारी सायंकाळी उशीरा विलास पाटील आपल्या मतदारांचे आभार मानत असतानाच भाजपा आमदार समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला.
या हल्ल्याची माहिती विलास पाटील यांना समजताच विलास पाटील व त्यांच्या समर्थकांनी आमदार महेश चौघुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून आमदार चौघुले समर्थकांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
सुरुवातीला आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून, ज्यात महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले विलास पाटील यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हल्ला करायला गेला असल्याचे स्पष्ट दिसते. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Web Summary : A violent clash erupted between BJP MLA Mahesh Chaughule and ex-Mayor Vilas Patil's groups in Bhiwandi. Patil's supporters allegedly attacked Chaughule's office, leading to a tense situation. The conflict stems from a municipal election rivalry between their sons. Police intervened to control the situation after supporters attacked each other's homes.
Web Summary : भिवंडी में बीजेपी विधायक महेश चौघुले और पूर्व महापौर विलास पाटिल के गुटों में हिंसक झड़प हुई। पाटिल के समर्थकों ने कथित तौर पर चौघुले के कार्यालय पर हमला किया, जिससे तनावपूर्ण स्थिति पैदा हो गई। विवाद उनके बेटों के बीच नगर पालिका चुनाव की प्रतिद्वंद्विता से उपजा है। समर्थकों द्वारा एक-दूसरे के घरों पर हमला करने के बाद पुलिस ने स्थिति को नियंत्रित किया।