Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 21:48 IST2022-01-15T21:47:41+5:302022-01-15T21:48:29+5:30

Car Fire In Ambarnath: अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

Video: A car caught fire in Ambernath | Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग

Video: अंबरनाथमध्ये चालत्या कारला भीषण आग

अंबरनाथ - अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. शनिवारी सायंकाळी 7.45 मिनिटांनी भवानी चौकातून जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कार मधून अचानक धूर येऊ लागल्याची कल्पना कारच्या चालकाला येताच कारचा चालक आणि सहप्रवासी हे गाडीमधून उतरले. मात्र उतरताना त्याने गाडीचा हँड ब्रेक न लावल्याने पेटणारी कार तशीच उतरणीवरून खालती घसरत आली. सुदैवाने रस्त्यात विजेचा खांब आल्याने ती गाडी त्या विजेच्या खांबावर अडकली. स्थानिक रहिवाशांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण गाडी आगीच्या विळख्यात सापडली. स्थानिक रहिवासी यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अर्ध्या तासानंतर ही कार अग्निशामक दलाच्या जवानांनी शमवली.

Web Title: Video: A car caught fire in Ambernath