भरधाव टेम्पोने घेतला १२ वर्षीय मुलाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 18:40 IST2018-07-11T18:40:16+5:302018-07-11T18:40:37+5:30
भिवंडीतील धक्कादायक अपघात

भरधाव टेम्पोने घेतला १२ वर्षीय मुलाचा बळी
मुंबई - भिवंडीत भरधाव टेम्पोने वडिलांसोबत जात असलेल्या एका १२ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली. भिवंडीतील अवचितपाडा रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. वाहिद हसन सरदार असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातानंतर सुमारे दीड तास रूग्णवाहिका न आल्याने वाहिदचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता.
अवचितपाडा रस्त्यावरून वाहिद आपल्या वडिलांसोबत जात होता. त्याचवेळी भरधाव टेम्पोने त्याला धडक दिली. या अपघातात वाहिद खाली पडला आणि त्याच्या अंगावरून तो टेम्पो गेला आणि वाहिदचा जागीच मृत्यू झाला. रूग्णवाहिकेला कळवूनही तब्बल दीड तासाने ती घटनास्थळी आली. तोपर्यंत वाहिदचा मृतदेह रस्त्यावरच खितपत पडून होता. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. अपघातस्थळी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.