शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

वायफायला आधार ३२५०० वीजखांबांचा

By admin | Updated: November 7, 2015 01:12 IST

ठाणे शहर वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता पावले उचलली

ठाणे : ठाणे शहर वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता पावले उचलली असून स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून आता संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट करण्यासाठी ३२ हजार ५०० वीजखांबांचा उपयोग केला जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभागातून राबविला जाणार असून यापैकीच काही पोलवर पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही कॅमेरेही बसविणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांच्या एका कार्यक्रमात ठाणे शहर येत्या सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट करण्याबरोबरच शहरात १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने हा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी महापालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे ठाणे आता लवकरच स्मार्ट होणार आहे. (प्रतिनिधी)५१२ केबीपीएसपर्यंत इंटरनेट फ्रीवायफाय सिस्टीममध्ये ठाणे महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबंधित एजन्सीला विद्युत पोल उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार, ज्यांना या वायफायची सुविधा घ्यायची असेल, त्यांना सुरुवातीला १०० रुपये तेही एकदाच मोजावे लागणार आहेत. यामध्ये ५१२ केबीपीएसपर्यंत इंटरनेट फ्री असून त्यापुढील वापरासाठी चार्जेस पे करावे लागणार आहेत. यातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्यातील कमीतकमी १० टक्के हिस्सा हा पालिकेला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही...याच माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून यासाठी काही ठिकाणी विद्युत पोलचा वापर केला जाणार आहे. याचे केंद्र स्थानिक पोलीस ठाणे असणार असून मुख्य केंद्र वाहतूक पोलिसांचे कार्यालय असणार आहे. महापालिकेला मोफत वायफाय सेवा...ठाणेकरांवर जरी काही अंशी वायफाय सेवेचा भार पडणार असला तरी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासह रुग्णालये, प्रभाग समिती कार्यालये आदींसह पालिकेच्या सर्व सेवांच्या ठिकाणी ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.