शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

तेल वापरा, तरीही ह्रदयरोग पळवा!

By admin | Updated: January 6, 2016 01:03 IST

रक्तदाब, स्थूलपणा, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवून ह्रदय शाबूत राखण्याकरिता सध्या वेगवेगळ््या ब्रॅण्डेड कंपन्यांचे खाण्याचे तेल वापरण्याकडे लोकांचा कल असताना

मुरलीधर भवार,  डोंबिवलीरक्तदाब, स्थूलपणा, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवून ह्रदय शाबूत राखण्याकरिता सध्या वेगवेगळ््या ब्रॅण्डेड कंपन्यांचे खाण्याचे तेल वापरण्याकडे लोकांचा कल असताना लाकडी घाण्यावर काढलेले, नैसर्गिक, आरोग्यवर्धक तेल उपलब्ध करून देण्याचा प्रयोग येथील वर्षा दांडेकर यांनी सुरु केला आहे. विशेष म्हणजे लोकांचा अवघ्या महिन्याभरात त्यांना चांगला प्रतिसाद मिळला आहे. तेल म्हटले की, तिळाचे. तिळापासून तेल हा शब्द आला असल्याचे भाषेचे जाणकार सांगतात. अनेक कंपन्या तेलाचे उत्पादन करतात. त्यांच्या तेलाचा दर्जा आणि गुण इतर कंपन्यांपेक्षा कसे चांगले आहेत, याचा दावा जाहिरातीतून केला जातो. तेल कंपन्या खाद्य तेलाचे उत्पादन करताना त्यावर रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रोल वाढते. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्ट्रोलचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला फायदाच होतो.दांडेकर यांनी लाकडी घाण्यावर काढलेले तेल रामनगर, शिवमंदिर रोडवरील शिवकृपा येथे मिळते. सध्या पांढऱ्या व काळ््या तिळाचे, खोबरेल, जवस, अक्रोड, शेंगदाणा, मोहरी, करडई, बदाम तेल उपलब्ध होते. याविषयी दांडेकर यांनी सांगितले की, त्यांची भाची आरती सागर जोशी हिला ठाण्यातील एका डॉक्टराने सल्ला दिला की, लाकडी घाण्यावर काढलेले तेल खाण्यात वापरले तर त्याचा आरोग्याला चांगला फायदा होईल. तिने त्याचे पालन केले. लाकडी घाण्यावर गेली ४० वर्षे तेला काढून विक्री करणाऱ्या पुण्याच्या रामकृष्ण आईल मिलकडे दांडेकर गेल्या. त्यांनी सांगितले की, डोंबिवली व मुंबईच्या उपनगरातून काही लोक पुण्याला येऊन हे तेल घेऊन जातात. दांडेकर यांनी सुरुवातीला पुण्यातून तेल आणून ते विकण्यास सुरुवात केली. महिन्याभरात ६० लीटर तेलाची विक्री झाल्याने या तेलास मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ह्रदयासाठी करडईचे तेल उपयुक्त आहे. आक्रोडाचे तेल केसांच्या मजबूतीसाठी व केसातील कोंडा व शुष्कपणा दूर करणारे आहे. दांडेकरांनी विक्री करण्यापूर्वी आधी स्वत: तेल वापरून पाहिले. डोंबिवलीत सोय झाल्याने पुण्याला जाण्याची गरज भासत नसल्याचे अनेकांनी दांडेकर यांना सांगितले.