लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:43 IST2020-08-18T00:43:34+5:302020-08-18T00:43:47+5:30
तणावाखाली असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी मीरा रोडच्या नयानगर भागात घडली आहे.

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाची आत्महत्या
मीरा रोड : नोकरी नसल्याने तणावाखाली असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी मीरा रोडच्या नयानगर भागात घडली आहे.
पूजानगरच्या गुलिस्ताननगरमध्ये डॉ. शाबाद अन्सारी यांचा दवाखाना आहे. दवाखान्यापुढील पत्र्याच्या शेडला सोमवारी गळफास घेतलेला तरुणाचा मृतदेह आढळला. त्याच्या खिशात एका व्हिजिटिंगकार्डावर काही लिहिलेले आढळले. दुबईची नोकरी गेली आणि दुसरी नोकरी नसल्याने तणावाखाली आहे. अम्मी, अब्बू मी हरलो, असे त्यात लिहिलेले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .
सलमान फेब्रुवारीत दुबईची नोकरी गेल्याने घरी परतला होता. नंतर लॉकडाऊनमुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.