उल्हासनगर महापालिका भरारी पथकाकडून ५० लाखाची रोकडं जप्त, विठ्ठलवाडी गुन्ह्या दाखल करण्याची प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 22:17 IST2026-01-13T22:16:51+5:302026-01-13T22:17:30+5:30
उल्हासनगर निवडणूक प्रचाराच्या तोफा सायंकाळी थांबली असताना, सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-४, सुभाष टेकडी येथून जाणाऱ्या एका रिक्षात काळ्या बॅग स्थानिक उमेदवार नरेश गायकवाड, प्रशांत धांडे यांना दिसल्या.

उल्हासनगर महापालिका भरारी पथकाकडून ५० लाखाची रोकडं जप्त, विठ्ठलवाडी गुन्ह्या दाखल करण्याची प्रक्रिया
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातून मंगळवारी सायंकाळी जाणाऱ्या एका रिक्षा वाहनातून पोलिसांच्या मदतीने स्थानिक उमेदवारांनी पैशाची बॅग पकडून दिली.. विठ्ठलवाडी पोलीस याबाबत चौकशी करीत असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगर निवडणूक प्रचाराच्या तोफा सायंकाळी थांबली असताना, सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-४, सुभाष टेकडी येथून जाणाऱ्या एका रिक्षात काळ्या बॅग स्थानिक उमेदवार नरेश गायकवाड, प्रशांत धांडे यांना दिसल्या. त्यांनी रिक्षाचा पाठलाग करून रिक्षाला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आणून बॅगची झाडाझडती घेतली असता, त्यामध्ये पैशे असल्याचे उघड झाले. पैशाच्या बॅगसह दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पैशाबाबत रिक्षा चालकांचा जबाब पोलीस घेत आहे. मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आणले जात असल्याचा आरोप होत आहे. महापालिका भरारी पथकाने सदर पैशाची बॅग पकडल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी देऊन याबाबत विठ्ठलवाडी पोलीस तपास करीत असल्याची माहिती दिली. तर बॅग मध्ये अंदाजे ५० लाखाची रोकडं असल्याचे साबळे म्हणाले.
विठ्ठलवाडी पोलिसांनी पैशाची बॅग व दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शहरांत मतदान साठी पैशाचे वाटप होणार असून पैशाची ले-आण सर्रासपणे होत असताना महापालिका भरारी पथक कोणाचे काम करते? असा प्रश्नही विचारला जात आहे.