शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका आयुक्तांची बैठक; पावसाळ्यापूर्वीच्या कामाचा घेतला आढावा

By सदानंद नाईक | Updated: June 19, 2024 18:48 IST

उल्हासनगर - महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी सभागृहात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीच्या विकास कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना ...

उल्हासनगर - महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी सभागृहात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीच्या विकास कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीला महापालिकेच्या विभाग प्रमुखासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगरात विविध विकास कामे सुरू असून त्या विकामाचा पावसाळ्यापूर्वी आढावा घेण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. बैठकीला विभागप्रमुखासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले विकासकामे विहित वेळेत पूर्ण करणेबाबत यावेळी आयुक्तांनी निर्देश दिले. शहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करून, ज्या इमारती धोकादायक व अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या इमारतीचे सर्वेक्षण करणे, त्यांना नोटीस देणे, सदर इमारतीचे ऑडिट करून घेणे, अतिधोकादायक असल्यास निष्कासीत करण्याचे निर्देश दिले. तसेच कामगार हजेरी शेडची पाहणी करून कामावर हजर व गैरहजर यांची पाहणी करून दिर्घकालीन गैहरजर असल्यास त्या कामगारांवर कारवाई करण्याचे सुचविले आहे. सफाई कामगाराकडे जंतूनाशक पावडर व इतर सफाई साहित्य पुरेसे आहे का? याची खातरजमा करणे. सर्व छोटे व मोठे नाल्यांची पाहणी करून त्यांचा अद्ययावत अहवाल सादर करणे, लहान-मोठ्या नाल्यांची सफाई त्वरीत करून घेणे. आदींच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत केल्या आहेत. 

शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करून, जलवाहिन्यांतील गळती त्वरीत थांबविणेवावत कार्यवाही करणे, एमएमआरडीए मार्फत बनविण्यात येणाऱ्या ७ रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे, रस्त्यांवरोल खड़े जीएसपीने बुजविणे व पाऊस थांवल्यावर त्यांचे डांबरीकरण करणे, रस्त्यावरील विद्युत खांबाची पाहणी करून सुस्थितीत करणे, विद्युत वाहिन्यांवरील अडसर येणा-या सर्व झाडांच्या फांद्यांची छटाई करणे, भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने, त्यांचे निर्बिजीकरण करण्याची कार्यवाही जलद करणे आदी कामाचे निर्देश बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त अजीज शेख यांनी दिले आहे.