शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

उल्हासनगर पाठोपाठ ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 3:52 PM

उल्हासनगरपाठोपाठ ठाण्यातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याची माहिती समोर आली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनही कमी पडत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

ठळक मुद्देश्वान दंशात ३ ते ८ वयोगटातील मुलांचा अधिक समावेशभटक्या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात

ठाणे - उल्हासनगर मध्ये भटका कुत्र्याच्या चाव्यामुळे सात मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर आता प्रत्येक शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा आ वासून उभी राहिली आहे. ठाण्यात भटका कुत्रा चावा घेण्याचे दिवसाचे प्रमाण हे ५० ते ६० असे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात पालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही या कुत्र्यांची संख्या आजच्या घडीला लाखाच्या घरात गेली असल्याची माहितीसुध्दा एका अहवालातून समोर आली आहे.                      शुक्रवारी उल्हासनगरच्या कॅम्प नं. ३ मध्ये भटक्या कुत्र्याच्य चाव्यामुळे सात मुले जमखी झाल्याची घटना घडली आहे. परंतु एकाच वेळेस सात जणांना चावा घेतल्याने ही घटना समोर आली आहे. परंतु एखाद दुसरी घटना असती तर ती समोर आली नसती. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक जण कुत्र्याने चावा घेतल्यास ते खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी होत नाही. जे रुग्ण पालिकेकडे उपचार घेतात. त्यांची नोंद पालिकेच्या दप्तरी होत असते. त्यामुळे महापालिकेच्या दप्तरी ही नोंद केवळ ४ ते ५ पर्यंतच कधी कधी असते. परंतु वास्तविक हा आकडा ५० ते ६० च्या घरात असल्याची माहिती भटक्या कुत्र्यांवर अभ्यास करणारे दक्ष नागरीक सत्यजीत शहा यांनी समोर आणली आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर या अश्या भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे, याच कुटुंबियातील १० वर्षीय आर्यनला मागील महिन्यात दुकानात गेला असता त्याच्या पाठीवर चढत एका भटक्या कुत्र्याने पाठीचा चावा घेतला होता. परंतु आज ही आर्यनच्या मनात या भटक्या कुत्र्यांविषयी भीती कायम आहे. त्यातही लहान मुलांवरील भटक्या कुत्र्यांचे हल्ले हे वाढल्याचे दिसत आहे. श्वान दंशाच्या घटनांपैकी ८० टक्के घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालकांचा समावेश असल्याचेही शहा यांनी सांगितले. ठाणे शहरात अंदाजे जवळपास एक लाख एवढी भटक्या कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाणे पालिकेचा उदासीनपणा हे सर्वात मोठे कारण समोर येत असून निर्बिजीकरण झाल्यानंतरही भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही आजही भटक्या कुत्र्यांची गणना मात्र पालिकेकडून झालेली नाही. मागील दिड वर्षापूर्वी या कुत्र्यांची गणना करण्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु अद्यापही या कुत्र्यांची गणना झालेली नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdogकुत्रा