अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृतास नागरिकांचा चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 19:39 IST2018-04-20T19:39:12+5:302018-04-20T19:39:12+5:30

 कॅम्प नं 4 येथील  संभाजी चौक परिसरातील झेरॉक्स दुकानासमोर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एक जण  अश्लील चाळे करीत होता. स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या इसमाला जाब विचारात चोप देउन, विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Ulhasnagar crime News | अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृतास नागरिकांचा चोप

अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृतास नागरिकांचा चोप

उल्हासनगर -  कॅम्प नं 4 येथील  संभाजी चौक परिसरातील झेरॉक्स दुकानासमोर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एक जण  अश्लील चाळे करीत होता. स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या इसमाला जाब विचारात चोप देउन, विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
उल्हासनगर कॅम्प नं -4 येथील संभाजी चौकात झेरॉक्स दुकान आहे. दुकानात झेरॉक्स व इतर साहित्य घेण्यासाठी शाळेकरी मुली येतात. नेहमी प्रमाणे शुक्रवारी दुपारी एक शाळेकरी अल्पवयीन  मुली दुकाना समोर उभी होती. त्यावेळी अंदाजे 45 वर्षाचा इसम जबरदस्तीने मुलीसोबत अश्लिल चाळे करीत होता. मुलगी इसमाच्या चाळने हैराण झाली. हे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर, नागरिकांनी इसमाला जाब विचारात चोप दिला.तसेच विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.इसमाचे नाव मोहन रतन खरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्यावर विनायभंगासह  पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी चौक परिसरात सत्य साई, अभंग, स्वरस्वती, नैशनल अश्या चार शाळा आहेत. चौतून नेहमी शाळेकरी मुलांचे जाणे -येणे असून मुली सोबत चाळे करण्यासाठी टपोरी मुलांची वर्दळ ठरलेली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांना याची कल्पना असूनही काही एक कारवाई नाही. काही वर्षांपूर्वी स्थानिक नगरसेवक रमेश चव्हाण आणी त्यांच्या पदाधिका-यांनी टपोरी मुलांना चोप दिल्याने, त्यांच्यात दहशद निर्माण झाली होती. तसेच चव्हाण यांनी स्वखर्चाने चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने, गुन्ह्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या चौकातील पानटपरी, हटविण्याची मागणी यावेळी स्थानिक नागरिकानी पोलिसांकडे केली. 

Web Title: Ulhasnagar crime News