उल्हासनगरात छमछम सुरूच, आंचल लेडीस बारवर कारवाई, २३ जणावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:21 IST2025-09-16T18:19:37+5:302025-09-16T18:21:45+5:30
दोन दिवसापूर्वी हॅन्ड्रेड डे महिला बारवर कारवाई करून महिला वेटरसह ९ जणावर कारवाई झाली होती.

उल्हासनगरात छमछम सुरूच, आंचल लेडीस बारवर कारवाई, २३ जणावर गुन्हा
उल्हासनगर : कॅम्प नं-३, पवई चौकातील आंचल लेडीस बार मध्ये तोकड्या कपड्यात अश्लील कृत्य करणाऱ्या ११ वेटरसह तब्बल २३ जणावर सोमवारी रात्री साडे दहा वाजता मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. दोन दिवसापूर्वी हॅन्ड्रेड डे महिला बारवर कारवाई करून महिला वेटरसह ९ जणावर कारवाई झाली होती.
उल्हासनगरात लेडीस सर्व्हिस बारमध्ये बिनधास्त छमछम सुरू असल्याची चर्चा रंगली होती. त्यादरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी तोकड्या कपड्यात अश्लील कृत्य करणाऱ्या हॅन्ड्रेड लेडीस बारवर कारवाई करून लेडीस वेटरसह ९ जणावर गुन्हे दाखल केले होते. सोमवारी पवई चौकातील आंचल लेडीस सर्व्हिस बार मध्ये महिला वेटर तोकड्या कपड्यात अश्लील कृत्य करीत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली. रात्री साडे दहा वाजता पोलिसांनी आंचल लेडीस सर्व्हिस बारवर कारवाई करीत ११ महिला वेटरसह तब्बल २३ जणाला अटक करून गुन्हा दाखल केला.
पोलीस कारवाईत बार चालक जया शेट्टी, बार व्यवस्थापक रविकांत तिवारी, रमेश श्रीपत मलिक, पद्मालोचन सुदाम माझी, शिवकुमार श्रीरमेशचंद्र गुप्ता, दीपा मनोहर भाईप, लक्ष्मी विष्णू गुरंग, वंदनासिंग रणजितसिंग ठाकूर, अनुजा लक्ष्मण सिंग, संपर ओसीम व्यापारी, रेश्मा खातून रशीद मुल्ला, पिंकी नितीन विश्वास, रेणुका खातून दुलाल शेख, पौर्णिमा संभू दास, देवी सेंदु कोणाई, रोहित श्यामलाल छाब्रिया, मोहम्मद मतीन अब्दुल सलाम, कुलदीप हरिगोविंद गुप्ता, सुमित सुधाकर पवार, गणेश राम कल्याणकर, विजय गणपत तेजम, हेमंत विठ्ठल इशवाद व रामेश्वर मदन गवळी अश्या २३ जणाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.