उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:12 IST2025-10-28T17:12:20+5:302025-10-28T17:12:46+5:30
कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला धक्का न बसता, शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू यांनी दिली.

उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : उद्धवसेनेचे शहरप्रमुख (पश्चिम) कुलविंदर सिंह बैंस यांनी सहकार्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. या प्रवेशाने उद्धवसेनेला धक्का बसला असून निवडणुकीपूर्वी असेच धक्के. बसणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिले.
उल्हासनगरात उद्धवसेनेला घरघर लागली असून जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे हे सहकाऱ्यांच्या मदतीने एकहाती पक्षाचा किल्ला लढवत आहेत. पक्षाचे शहर पश्चिमचे शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांच्यासह इंदर गोपलानी, सुनील पवार आदी जणांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र. चव्हाण यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. चव्हाण यांनी कुलविंदर सिंह बैंस यांच्यासह त्यांच्या सहकार्याचे स्वागत केले.
यावेळी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, संजय सिंग, प्रशांत पाटील, अजित सिंह लबाना, लता पगारे, स्वप्निल पगारे, संजय गुप्ता, मोहन खंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला धक्का न बसता, शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू यांनी दिली.