ठाण्यात दोन महिलांचा विनयभंग करणाऱ्या ‘झोमॅटो’च्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:20 PM2019-08-27T22:20:36+5:302019-08-27T22:32:37+5:30

एकीकडे ‘झोमॅटो’च्या महिला प्रतिनिधीने नवी मुंबईच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांनाच ठाण्यात दोन महिलांचा विनयभंग करणा-या ‘झोमॅटो’च्याच छोटेलाल सोनी आणि गजानन शिंदे या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

 Two Zomato men arrested for violating two women in Thane | ठाण्यात दोन महिलांचा विनयभंग करणाऱ्या ‘झोमॅटो’च्या दोघांना अटक

शिवीगाळ करीत केला विनयभंग

Next
ठळक मुद्देघोडबंदर रोडवरील घटनाशिवीगाळ करीत केला विनयभंगदुचाकी चालविण्यावरुन घातला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोडने ब्रम्हांड सिग्नल येथून स्कूटरवरून घरी जाणा-या ३७ आणि २७ वर्षीय दोन महिलांचा विनयभंग करणा-या छोटेलाल सोनी (३५, रा. कोपरी, ठाणे) आणि गजानन शिंदे (२९, रा. कळवा, ठाणे) या दोघांनाही कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. हे दोघेही ‘झोमॅटो’ या अन्न पदार्थांची सेवा पुरविणाºया कंपनीचे डीलीवरी प्रतिनिधी आहेत.
राबोडी येथे राहणारी ३७ वर्षीय पीडित महिला ही घोडबंदर रोडवरील एका रुग्णालयात तिच्या आईच्या उपचारासाठी आली होती. २६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास उपचारानंतर तिने आईला रिक्षात बसवून दिले. त्यानंतर ती तिच्या २७ वर्षीय मैत्रिणीसमवेत स्कूटरवरून राबोडी येथे जात होती. त्या सेंट झेवियर्स स्कूलच्या समोरील ब्रम्हांड सिग्नलवर आल्या असतांना त्यांच्या मागून आलेल्या या दोघांपैकी मागे बसलेल्या शिंदे याने त्यांना शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. तर मोटारसायकलस्वार छोटेलाल यानेही त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याचवेळी शिंदे याने त्यांना मारहाणीसाठी हातही उगारला. तेंव्हा तिथे असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांनी ठाणे शहर नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनी त्याठिकाणी तत्काळ धाव घेतली. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे यांच्या पथकाने या दोघांनाही रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.

Web Title:  Two Zomato men arrested for violating two women in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.