चाकूच्या धाकावर चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 20:55 IST2021-03-29T20:53:08+5:302021-03-29T20:55:37+5:30

चाकूच्या धाकावर भिमराज गैरी (३१, रा. मानपाडा, ठाणे) या चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

The two robbed the tea seller with a knife | चाकूच्या धाकावर चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडले

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देआठ हजारांची रोकड लुटलीकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चाकूच्या धाकावर भिमराज गैरी (३१, रा. मानपाडा, ठाणे) या चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मानपाडा येथे राहणारे भिमराज गैरी हे त्यांचा मेव्हणा हिरालाल गैरी यांच्या आझादनगर बस थांब्याच्या मागील तुळसा चाय सेंंटर च्या बाजूला असलेल्या ‘महालक्ष्मी ओल्ड पेपर मार्ट’ या भंगाराच्या दुकानात २७ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्याचवेळी तिथे आलेल्या २२ ते ३० वयोगटातील दोन लुटारुंनी त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनी त्यांना मारहाण करुन चाकूच्या धाकावर त्यांच्याकडील आठ हजारांची रोकड जबरीने लुबाडली. याप्रकरणी २८ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.  

 

Web Title: The two robbed the tea seller with a knife