शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोलशेतमधील दोन अल्पवयीन मुली सापडल्या पुण्यात; आईवडील रागावतात म्हणून मुलींनी सोडले होते घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:24 IST

कोलशेत भागातून ७ मार्च रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्या कोलशेत येथील एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकतात. दोघींपैकी एकीच्या रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी तिला ७ मार्च रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास महाविद्यालयात सोडले. पुन्हा तिला सकाळी ११ वाजता महविद्यालयात घेण्यास गेल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही. 

जितेंद्र कालेकर -

ठाणे : आई-वडील रागावतात, आपसात नेहमीच भांडतात, या  प्रकाराला कंटाळून कोलशेत भागातून १५ आणि १६ वर्षीय दोन मुलींनी घर सोडले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने तीन दिवसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. कोलशेत भागातून ७ मार्च रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्या कोलशेत येथील एका कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकतात. दोघींपैकी एकीच्या रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी तिला ७ मार्च रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास महाविद्यालयात सोडले. पुन्हा तिला सकाळी ११ वाजता महविद्यालयात घेण्यास गेल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही. 

महाविद्यालयातही ती गेली नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यांच्याच मित्राची मुलगी असलेली तिची  मैत्रीणही बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्या सापडल्या त्यावेळी आईवडिलांची भांडणे आणि त्यांचे रागावणे, आदी कारणामुळे कुटुंबीयांना माहिती न देताच घर सोडल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली.

लोकेशनच्या आधारे शोध बेपत्ता दोघींचाही परिसरात शोध घेऊनही त्या न सापडल्याने या गंभीर प्रकाराबाबत अपहरणाचा संशय व्यक्त करीत त्यांनी ८ मार्च रोजी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कापूरबावडी पोलिसांबरोबरच गुन्हे अन्वेषण विभागानेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. दोघींपैकी एकीकडे मोबाइल असल्याने लोकेशनच्या आधारे त्यांचा तपास सुरू केला. 

पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि  वागळे इस्टेट युनिटचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील, पोलिस हवालदार मीनाक्षी मोहिते, तेजस ठाणेकर आणि जगताप, आदींच्या पथकाने १० मार्च रोजी त्यांचा पुणे परिसरातून शोध घेतला. 

कर्जत स्थानकात काढली रात्रीपळून गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी ठाण्यातून कर्जत रेल्वे स्थानक गाठले. तिथे रात्र काढल्यानंतर पुणे गाठले. 

आई-वडिलांकडून मिळणाऱ्या खाऊच्या पैशांमधून त्यांनी पुण्यातच स्वत:साठी मनसाेक्तपणे खाण्याचे पदार्थ घेतले. त्यानंतर सोलापूरमधील एका नातेवाइकांकडे जाण्याच्या बेतात असतानाच पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolse girls found in Pune; ran away due to parental scolding.

Web Summary : Two Kolse girls, aged 15 and 16, ran away from home due to constant parental scolding and arguments. Police located them in Pune after three days. They initially went to Karjat, then Pune, spending money on food before planning to go to Solapur.
टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी