दोन विवाहित महिलांनी एकमेकींच्या पतींवर दाखल केले विनयभंगाचे गुन्हे; अश्लील इशारे केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:07 IST2022-04-18T13:06:11+5:302022-04-18T13:07:08+5:30

मीरारोड : भाईंदर पश्चिमेच्या ६० फुटी मार्ग परिसरात राहणाऱ्या दोघा विवाहित महिलांनी एकमेकींच्या पतींवर विनयभंग केल्याचा गुन्हा भाईंदर पोलीस ...

Two married women commit crimes of molestation against each other's husbands in Mira Bhayender | दोन विवाहित महिलांनी एकमेकींच्या पतींवर दाखल केले विनयभंगाचे गुन्हे; अश्लील इशारे केल्याचा आरोप

दोन विवाहित महिलांनी एकमेकींच्या पतींवर दाखल केले विनयभंगाचे गुन्हे; अश्लील इशारे केल्याचा आरोप

मीरारोड : भाईंदर पश्चिमेच्या ६० फुटी मार्ग परिसरात राहणाऱ्या दोघा विवाहित महिलांनी एकमेकींच्या पतींवर विनयभंग केल्याचा गुन्हा भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल केला.

भाईंदर पश्चिमच्या शांती नगर भागात राहणाऱ्या एका २९ वर्षांच्या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, त्या रात्रीच्या वेळी फेरफटका मारत असताना राधास्मृती इमारतीत राहणाऱ्या अमरीत माली यांनी अश्लील शेरेबाजी व इशारे करणे तसेच इमारतीपर्यंत पाठलाग करणे आदी प्रकार केले. तेथील एक दुकानदार करण हे सुद्धा अमरीत बरोबर मिळून छेड काढत होते. १३ एप्रिल रोजी पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केला .

अमरीत यांच्या २३ वर्षांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, दीक्षित मागील दोन महिन्यांपासून त्या कामावर जात असताना रस्त्यात उभे राहून शेरे व शिटी मारून इशारे करीत होते. एकदा इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर दीक्षित दुचाकी घेऊन आले व मोबाईल क्रमांक मागितला. अमरीत हे दीक्षितांकडे जाब विचारण्यास गेले असता त्यांना मारहाण करीत धमकी दिली. या दोन्ही गुन्ह्यांचा भाईंदर पोलीस तपास करत आहेत

Web Title: Two married women commit crimes of molestation against each other's husbands in Mira Bhayender