तरुणीच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 21:36 IST2021-07-29T21:35:20+5:302021-07-29T21:36:34+5:30

तरुणीच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना नौपाडा भागात नुकतीच घडली. याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

The two escaped by pulling the gold chain around the girl's neck | तरुणीच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांचे पलायन

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तरुणीच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना नौपाडा भागात नुकतीच घडली. याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्याच्या चरई भागात राहणारी ही १८ वर्षीय तरुणी १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आम्रपाली हॉटेलच्या समोरुन मोबाईलवर बोलत जात होती. त्याचवेळी तिच्या पाठीमागून मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने तिच्या हातातील दहा हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणाी २७ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक भडे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The two escaped by pulling the gold chain around the girl's neck