ठाण्यात झाडाची फांदी पडल्याने दोघे दुचाकीस्वार जखमी, घोडबंदर रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 19:08 IST2022-05-22T19:08:26+5:302022-05-22T19:08:41+5:30
घोडबंदर रोड मार्गे दुचाकीवरून जाणाºया तरंग चतुवेर्दी (३५) आणि पवन शर्मा (२२) यांच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडल्यामुळे ते दोघेही जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कासारवडवली येथे घडली.

ठाण्यात झाडाची फांदी पडल्याने दोघे दुचाकीस्वार जखमी, घोडबंदर रोडवरील घटना
ठाणे:
घोडबंदर रोड मार्गे दुचाकीवरून जाणाºया तरंग चतुवेर्दी (३५) आणि पवन शर्मा (२२) यांच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडल्यामुळे ते दोघेही जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कासारवडवली येथे घडली. या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मुंबईच्या कांदिवलीतील तरंग आणि भाईंदरमधील पवन हे घोडबंदर रोड मार्गे दोन वेगवेगळया मोटारसायकलीवरुन जात होते. ते कासारवडवली येथे आल्यानंतर अचानक एका झाडाची फांदी तुटून त्यांच्या अंगावर कोसळली. यात हे दोघेही जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पडलेली झाडाची फांदी कापून बाजूला करण्यात आली. या घटनेत तरंग याच्या डोक्यावर तसेच पोटाला तर पवन याच्या तोंडावर आणि मानेवर दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.