उल्हासनदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 22:11 IST2018-01-18T22:11:03+5:302018-01-18T22:11:16+5:30
क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत.

उल्हासनदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू
कल्याण - क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोघांचेही वय 13 होते. या घटनेची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शहाड येथील अवस्थी चाळीत राहणारा नितिन आणि उल्हासनगर गोलमैदानाजवळ येथील शुभम असे दोघेजण गुरु वारी दुपारी क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडले पण क्लासला न जाता ते उल्हास नदीत पोहण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यासोबत आणखीन एक मुलगा होता. तिघेही नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तिघेही बुडू लागले. आजुबाजुच्या नागरीकांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात तिघांमधील एकाला वाचविण्यात यश आले. मात्र अन्य दोघेजण बेपत्ता झाल्याने कल्याण अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. परंतू घटनास्थळी पोहोचलेल्या अग्नीशामक दलाच्या जवानांच्या हाती नितिन आणि शुभम या दोघांचे मृतदेह लागले. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणी बाई रु ग्णालयात पाठवण्यात आले असून वाचविण्यात आलेल्या अन्य एकाला त्याठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान नदीत पोहण्यासाठी दोघेच उतरले होते आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाल्याची माहीती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले.