जुन्या भांडणाच्या रागातून दोन भावांचा एकावर चाकू हल्ला

By सदानंद नाईक | Updated: September 1, 2023 17:21 IST2023-09-01T17:21:01+5:302023-09-01T17:21:33+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Two brothers attack young man with a knife out of anger over an old feud | जुन्या भांडणाच्या रागातून दोन भावांचा एकावर चाकू हल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून दोन भावांचा एकावर चाकू हल्ला

 उल्हासनगर : जुन्या भांडणाच्या रागातून दोघा भावाने एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमी तरुणावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ टिळकनगर परिसरात राहणाऱ्या किशोर उर्फ अक्षय पढार यांचे बुधवारी रात्री आठ वाजता संसारे भावा सोबत भांडण झाले होते. दरम्यान रात्री साडे अकरा वाजता किशोर हा मित्र वृत्तिक पारधी या मित्रा सोबत पाण्याच्या टाकी खालून मोटरसायकलने जात होता. त्यावेळी भीमा व शंकर संसारे या दोघा भावाने जुन्या भांडणाच्या रागातून मोटारसायकलने जात असलेल्या किशोर उर्फ अक्षय पढार याला घडवून मारहाण केली. तसेच किशोरला संसारे भावाने पकडून चाकूने पाठ, पोट, पाय यावर वार करून पळून गेले. जखमी कोशोर पढार यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

 

Web Title: Two brothers attack young man with a knife out of anger over an old feud