वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 21:42 IST2021-07-29T21:38:31+5:302021-07-29T21:42:45+5:30
ठाण्यातील एका वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाºया सागर यादव (२१) आणि हेमंत ठाणवी (२१, रा. दोघेही अशोकनगर, भिवंडी) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

मोबाईल चोरीचे सहा गुन्हे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील एका वकीलाच्या मोबाईलची जबरी चोरी करणाºया सागर यादव (२१) आणि हेमंत ठाणवी (२१, रा. दोघेही अशोकनगर, भिवंडी) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख दहा हजारांचे १८ मोबाईल हस्तगत केले आहेत.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळून २२ जुलै २०२१ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील एक वकील पायी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या सागरसह दोघांनी त्यांच्या हातातील २४ हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने भिवंडीतून सागर आणि हेमंत या दोघांना २३ जुलै रोजी अटक केली. त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दोन, नौपाडा भागातील तीन तर राबोडीतील एक असे सहा मोबाईल चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १६ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.