रेमडेसीव्हरच्या इंजेक्शनची काळया बाजारात विक्री करणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:04 PM2021-04-16T18:04:22+5:302021-04-16T18:05:13+5:30

ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत.

Two arrested for selling Remedesivar injections on black market | रेमडेसीव्हरच्या इंजेक्शनची काळया बाजारात विक्री करणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली होती अटक

Next
ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली होती अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने त्यांना अलिकडेच अटक केली होती.
ठाण्यातील इंटरनिटी मॉल येथे आतीफ आणि प्रमोद हे दोघेही रेमडेसिविरच्या विक्रीसाठी १० एप्रिल रोजी आले होते. ते इंजेक्शनची चढया दराने विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाला एका सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने या दोघांनाही सापळा रचून अटक केली होती. एका इंजेक्शनची ते पाच हजारांमध्ये विक्री करीत होते. अंजूम हा ठाणे महापालिकेच्या पार्किग प्लाझा येथे मदतनीसाचे काम करतो. हे कोविड सेंटर चालविण्याचा ठेका असलेल्या ओम साई आरोग्य केअर या कंपनीने त्याला ब्रदर या पदावर नोकरीवर घेतले होते. महिना ३५ हजारांचा महिना असतांनाही त्याने याच हॉस्पीटलमधील १६ इंजेक्शन मिळवून ती बाहेर पाच हजारांमध्ये विक्री सुरु केली होती. त्याच्याकडून १६ इंजेक्शन जप्त केली आहेत. तर त्याचा साथीदार प्रमोद याच्याकडून पाच इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
अंजुम याची या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच नेमणूक असल्यामुळे त्याने या इंजेक्शनचा काळा बाजार करण्यास सुरुवात केली. या दोघांनाही १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने अंजूम आणि ठाकूर या दोघांनाही अटक केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूकीसह जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला ११ ते १६ एप्रिल या काळात त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती. याच कोठडीची मुदत शुक्रवारी (१६ एप्रिल रोजी) संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आणखी पोलीस कोठडीची मागणी खंडणी विरोधी पथकाने ठाणे न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली. पोलीस कोठडीऐवजी त्यांना ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. आता या प्रकरणात अन्यही कोणती टोळी सक्रीय आहे किंवा कसे? याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Two arrested for selling Remedesivar injections on black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.