मानपाड्यातील घरात शिरकाव करून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 00:22 IST2021-11-01T00:15:08+5:302021-11-01T00:22:04+5:30

मानपाडा येथील शिवा जैयस्वाल (२१, रा. गणोशनगर, मानपाडा, ठाणे) यांच्या घरात शिरकाव करून मोबाइल चोरणाऱ्या सलमान खान (१९) आणि हितेश शेट्टी (२३, रा. दोघेही मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली.

Two arrested for breaking into a house in Manpada and stealing a mobile phone | मानपाड्यातील घरात शिरकाव करून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना जेरबंद

कापूरबावडी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईमोबाइल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मानपाडा येथील शिवा जैयस्वाल (२१, रा. गणोशनगर, मानपाडा, ठाणे) यांच्या घरात शिरकाव करून मोबाइल चोरणाऱ्या सलमान खान (१९) आणि हितेश शेट्टी (२३, रा. दोघेही मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून एक मोबाइल हस्तगत केल्याची कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली.
मानपाड्यातील गणेश मंदिराजवळ राहणारे जैयस्वाल हे २६ ऑक्टोबर रोजी रात्री उकाड्यामुळे घराबाहेर झोपले होते. त्यावेळी घरात शिरकाव करुन सलमान आणि हितेश यांनी चोरीचा प्रयत्न केला. घरात काहीच न सापडल्यामुळे सात हजार दोनशे रुपयांचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक प्रियत्तमा मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे, जमादार राजेंद्र मोरे, पोलीस हवालदार शरद खोडे, पोलीस नाईक भरत घाटगे आणि निखिल जाधव आदींच्या पथकाने सलमान आणि हितेश या दोघांना २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शनिवारी दिले.

Web Title: Two arrested for breaking into a house in Manpada and stealing a mobile phone