शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वनखात्याच्या पर्यटक कराला तुंगारेश्वर देवस्थानाचा आक्षेप

By admin | Updated: January 7, 2016 00:27 IST

तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी वनखात्याने प्रत्येक पर्यटकाकडून वीस रुपयांचा कर आकारण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे

वसई : तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी वनखात्याने प्रत्येक पर्यटकाकडून वीस रुपयांचा कर आकारण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. तर येथील तुंगारेश्वर देवस्थान कमिटीनेही कर वसुलीला आक्षेप घेतला आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात प्राचिन शिव मंदिर तसेत बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम आहे. दुसरीकडे, पावसाळ्यात याठिकाणी अनेक धबधबे सुरु असतात. निसर्गरम्य परिसर मुंबईपासून अगदी जवळ असल्याने याठिकाणी पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षापासून वन खात्याने पर्यटकांकडून वीस रुपये कर आकारायला सुरुवात केली आहे. त्याला सर्वांनी विरोध केला आहे. आमदार विलास तरे यांनी वनमंत्र्यांकडे कर रद्द करण्याची मागणी केली आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करीत वनखात्याकडून कर वसुली सुरु ठेवण्यात आली आहे. वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात असलेल्या प्रसिध्द महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून वनविभागामार्फत प्रवेश शुल्क आकारणी केली जात असल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवेश शुल्क आकारणीमुळे भाविकांची संख्या कमी होत चालली असून देवस्थानाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती तुंगारेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी दिली. भाविकांकडून प्रवेश कर आकारणाऱ्या वनविभागाकडून भाविकांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. २००२ पासून सरकारने मंदिराकडे दुर्लक्ष केले असून अर्थ पुरवठाही बंद केला आहे. त्यामुळे मंदिराचा खर्च भागवणे आणि भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देताना देवस्थान कमिटीला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाटील म्हणाले. प्रवेश कर शासन निर्णयानुसार आकारला जातो. तुंगारेश्वर अभयारण्यात भाविकांसह पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे भाविक कोण आणि पर्यटक कोण ही वर्गवारी करणे कठीण असल्याने सरसकट शुल्क आकारणी केली जात असल्याचे, असे वसई वनविभागाचे वनपाल मनोहर अहिरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)