शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

महिला-मुलांच्या संरक्षणासाठी ‘भरोसा’ सेल; बालमजूर आणि भिक्षा मागणाऱ्यांचीही करणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:57 PM

पती-पत्नी वादात करणार समुपदेशन

ठाणे : जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘भरोसा’सेलची निर्मिती झाली आहे. या सेलचे उद्घाटन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या हस्ते सोमवारी झाले.

पोलीस महासंचालक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या आदेशानुसार हे भरोसा सेल ठाण्याचे पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात ९ मार्च रोजी सुरू झाले. या सेल अंतर्गत पती-पत्नीमधील कौटुंबिक वादामध्ये समुपदेशन केले जाते. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाºया बडी कॉप (पोलीस ठाण्याच्या स्तरावर नोकरदार महिलांना संकटकाळी तत्काळ मदत), शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका, पोलीस दीदी तसेच वुमन हेल्प डेस्कद्वारे पोलीस ठाण्यात येणाºया महिलांच्या तक्रारींचे समुपदेशन, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष आणि छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी दामिनी पथक आदी वेगवेगळ्या योजना या सेलद्वारे राबविण्यात येणार आहेत.

स्पेशल ज्युवेनाईल कोर्ट प्रोटेक्शन युनिट अंतर्गत लहान मुलांच्या अपहरणाची प्रकरणे, बालमजुरी, बेवारस मुलांच्या पालकांचा शोध घेणे, भिक्षा मागणारे आणि अनैतिक मानवी वाहतुकीमध्ये अडकलेल्या मुलांचा शोध आदी कम्युनिटी पोलिसिंग स्किम जून २०१९ मध्ये लागू झाली. त्यानंतर भरोसा सेलमध्ये या योजना समाविष्ट करून त्या सर्व योजनांचे कामकाज या सेलमार्फतीने पाहिले जाते. ठाणे पोलीस आयुक्तालयातही ९ मार्च २०२० पासून हा सेल कार्यान्वित केला आहे. या वेळी सह आयुक्तांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, सुनील बाजारे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव, पद्मजा चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, सई लेले, अंजली भालेराव, कल्पना मोरे आदी या वेळी उपस्थित होते.वाद सोडविण्यासाठी सकारात्मक उपयोग- मेखलाभरोसा सेल मार्फत कौटुंबिक वादातून विकोपाला जाणारी पती- पत्नीमधील भांडणे सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांमार्फतही प्रयत्न केले जाणार आहेत. या सेलचा संकटातील नोकरदार महिलांनाही चांगल्या प्रकारे उपयोग होणार असल्याचा विश्वास मेखला यांनी व्यक्त केला.या सेलमध्ये येवून समस्या मांडल्यास नक्कीच सोडवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Policeपोलिस