खड्ड्यात आदळल्याने कोळसा भरलेला ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली

By नितीन पंडित | Updated: September 8, 2023 18:43 IST2023-09-08T18:42:57+5:302023-09-08T18:43:36+5:30

या दुर्घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

truck loaded with coal overturned after hitting the pit, luckily avoiding loss of life | खड्ड्यात आदळल्याने कोळसा भरलेला ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली

खड्ड्यात आदळल्याने कोळसा भरलेला ट्रक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली

भिवंडी: शहर परिसरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून गणेश आगमनापूर्वी तात्पुरती दुरुस्ती केलेले व मातीभराव करून भरलेले खड्डे गुरुवार व शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा वाहून गेल्याने शहरात सर्वत्र रस्ते खड्डेमय झाले आहेत.

शुक्रवारी या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एक कोळसा भरून निघालेला ट्रक कल्याण नाका परिसरातील कृष्णा कॉम्प्लेक्स जवळ आला असता येथे असलेल्या खड्ड्यात आदळल्याने पलटीझाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.अपघातादरम्यान ट्रक मधील कोळसा रस्त्यावर पसरला होता.या दुर्घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.या अपघाताची घटना सीसीटिव्हीत कैद झाली असून सिसिटीव्हीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

भिवंडीत खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून दोन दिवसांपूर्वीच खड्डयांमुळे एक ट्रक अडकल्याची घटना घडली होती तर एका उघड्या चेंबरमध्ये पडून दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला होता. वारंवार घडत असलेल्या या अपघातांमुळे शहरातील नागरिक मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Web Title: truck loaded with coal overturned after hitting the pit, luckily avoiding loss of life