अघईतील आश्रम शाळेत आदिवासी मुलीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 11:57 IST2018-12-26T11:57:00+5:302018-12-26T11:57:28+5:30
पोलिसांचेही वागणे संशयास्पद. पालकांकडून संशय व्यक्त.

अघईतील आश्रम शाळेत आदिवासी मुलीची आत्महत्या
ठाणे : अघई येथील शासकीय आश्रम शाळेतील आठवीच्या आदिवासी विद्यार्थिनीने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.
दिपाली वांगड असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या पालकांनी कोणीतरी तिला प्रवृत्त केले असावे किंवा तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला आहे. आश्रम शाळेतील निवासी कर्मचारी व शिक्षक यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांचेही वागणे संशयास्पद असून या मुलीचा पालकांना न कळवता व पंचनामा न करताच तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्याने संशय निर्माण झाला आहे.