शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

रुग्णवाहिकेवर कोसळले झाड, आपत्ती व्यवस्थापन विभागाची धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 9:38 AM

एकीकडे बुधवारी दिवसभर अवकाळी पाऊस सुरू होता. पाणी तुंबणे आणि झाडाची फांदी पडणे या घटनांव्यतिरिक्त अन्य कोणतीही घटना घडली नव्हती.

ठळक मुद्देकोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसून रुग्णवाहिकांच्या छताचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

ठाणे - कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारात बाजूबाजूला उभ्या केलेल्या दोन रुग्णवाहिकांवर वृक्ष उन्मळून पडल्याची घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी दोन्ही रुग्णवाहिकांच्या छताचे किरकोळ नुकसान झाले आहे.          एकीकडे बुधवारी दिवसभर अवकाळी पाऊस सुरू होता. पाणी तुंबणे आणि झाडाची फांदी पडणे या घटनांव्यतिरिक्त अन्य कोणतीही घटना घडली नव्हती. मात्र, अचानक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयातील आवारात वृक्ष उन्मळून दोन रुग्णवाहिकांवर पडले आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच, तातडीने आपत्ती विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने ते वृक्ष बाजूला करण्याचे काम हाती घेतले. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसून रुग्णवाहिकांच्या छताचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली. तसेच यावेळी एक क्युआर व्ही वाहन आणि एक जेसीबी पाचारण केले होते, असेही सांगितले.

घंटाळीत झाडाची फांदी पडली

ठाणे शहरातील नौपाडा येथील घंटाळी परिसरात एका झाडाची फांदी उभ्या केलेल्या चार दुचाकी गाड्यांवर पडली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत किंवा वाहनांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातFire Brigadeअग्निशमन दल