Join us  

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 6:52 PM

उन्हाचा तडाखा आणि डिहायड्रेशनमुळे शाहरुख खानची अचानक तब्येत बिघडली होती.

शाहरुख खानला (Shahrukh Khan) काल अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उष्माघाताचा फटका बसल्याने त्याची तब्येत बिघडली. आयपीएल प्ले ऑफ मॅचनंतर त्याला अॅडमिट करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं कळतंय. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने (Pooja Dadlani) ट्विट करत अभिनेत्याविषयी हेल्थ अपडेट दिली आहे.

उन्हाचा तडाखा आणि डिहायड्रेशनमुळे शाहरुख खानची अचानक तब्येत बिघडली होती. आयपीएलमधील प्ले ऑफ सामन्यासाठी तो स्वत:ची टीम KKR ला पाठिंबा देण्यासाठी आला होता. त्याचा उत्साह स्टेडियममध्ये दिसून आला. मात्र नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो रुग्णालयात गेला. आता त्याची तब्येत स्थिर असून मॅनेजर पूजा ददलालीने दुपारीच ट्वीट करत लिहिले, "मिस्टर खानच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार. शाहरुख आता स्थिर आहे. तुमच्या प्रेमासाठी, प्रार्थनेसाठी आणि काळजीसाठी खूप खूप आभार."

26 मे रोजी आयपीएल IPL फायनल होणार आहे. शाहरुखची टीम KKR आधीच फायनलमध्ये पोहोचली आहे. आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख स्वत:स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहे. दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहते चिंतेत होते. पण आता तो बरा झाला असून फायनलला हजेरी लावणार आहे. त्यामुळेही त्याचे चाहतेही खूश झालेत.

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडआरोग्यहॉस्पिटल