डोंबिवलीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग; दोन दुचाकी भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 18:02 IST2018-09-08T18:00:22+5:302018-09-08T18:02:27+5:30

डोंबिवलीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग; दोन दुचाकी भस्मसात
डोंबिवली : येथील नेहरू मैदानाजवळ ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने शेजारी लावलेल्या दुचाकीही जऴाल्या. आज सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली.
आग लागल्याचे समजताच स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक, राजेश मोरे यांनी घटनास्थळी दाव घेतली. तसेच अग्निशमन दलालाही याची माहिती देण्यात आली. या आगीमध्ये दोन दुचाकींनीही पेट घेतला. अग्निशमन दलाने ही आग विझविली. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.