शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

सातत्याने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांच्या दंडाच्या वसूलीसाठी वाहतूक पोलीस घरी धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 6:29 PM

वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण्याची नोटीसही तो बजावणार आहे. दंडाची रक्कमही तो तात्काळ वसूल करणार आहे.

ठळक मुद्देठाणे वाहतूक शाखेच्या उपायुक्तांचे आदेशठाण्यातील १२६९ वाहन चालकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अशा वाहन मालकाच्या घरी जाऊन त्याला नोटीस बजावून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत समुपदेशनही वाहतूक पोलिसांकडून केले जाणार आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर फेब्रुवारी २०१९ पासून ई चलान प्रक्रीयेद्वारे दंड आकारणी केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ दरम्यान प्रलंबित ई चलान संदर्भात ठाणे शहर वाहतूक शाखेने १८ उपविभागांमार्फत पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविली. या मोहीमेमुळे अगदी सेलेब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही आपल्या थकीत दंडाचा भरणा केला. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यामध्ये ठाणे वाहतूक शाखेने सहा कोटी २५ लाख रुपये वसूल करुन ते शासनाकडे जमा केले होते.सध्या सामान्य नागरिकांसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. यातूनच वाहतूकीच्या नियमांचे मोठया प्रमाणात उल्लंघन होत आहे. काही निर्ढावलेल्या वाहन चालकांनी वारंवार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध दहा हजारांपेक्षा जास्त दंड प्रलंबित आहे. अशा बेदरकार चालकांचा प्रलंबित दंड वसूलीसाठीच ही विशेष दंड वसूलीची मोहीम सुरु केल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितले. यामध्ये ठाणे आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेली वाहने आहेत. यात एमएच शून्य चार (ठाणे) ही तीन हजार १०५ तर एमएच शून्य पाच (कल्याण) या नोंदणीची ३४६ अशा एकूण तीन हजार ४५१ वाहनांवर दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक दंड प्रलंबित आहे. त्यापैकी एक हजार २६९ वाहन मालक हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी आहेत.* ज्या एक हजार २६९ वाहन धारकांचे पत्ते ठाणे आयुक्तालयातील आहेत, त्यांचे वाहतुक उपविभागनिहाय वर्गीकरण केले आहे. संबंधितत वाहन मालकांच्या घरी प्रलंबित दंडाची रक्कम भरण्याबाबतची नोटीस घेऊन आता वाहतूक शाखेचा कर्मचारी धडकणार आहे.* अनेक वाहनमालकांना त्यांच्या वाहनावर प्रलंबित चलान माहीत नसते. काहींना याची माहिती असूनही ते पुन्हा वाहतूक नियंमांचे उल्लंघन करतात. वरीलपैकी दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण्याची नोटीसही तो बजावणार आहे. दंडाची रक्कमही तो तात्काळ वसूल करणार आहे.* आॅनलाईनही भरता येणार दंडाची रक्कम-थकित दंडाची रक्कम आॅनलाईनद्वारे वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा पेटीएम अ‍ॅप किंवा वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाकडीत ई चलान मशिनवर अथवा जवळच्या वाहतूक चौकीवरही प्रत्यक्ष जाऊन भरावे असे आवाहन वाहतुक शाखेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस