उल्हासनगरात वाहतूक कोंडी, शहाड पुलाच्या कामासाठी आमदार आयलानी घेतली सर्व अधिकाऱ्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 21:04 IST2025-11-04T21:02:54+5:302025-11-04T21:04:13+5:30
उल्हासनगर शहाड पुल रस्त्याच्या दुरस्तीचे काम सुरू झाल्याने, शहरातील शांतीनगर ते १७ सेकशन रस्ता, डॉल्फिन मार्गे शहाड पूल रस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

उल्हासनगरात वाहतूक कोंडी, शहाड पुलाच्या कामासाठी आमदार आयलानी घेतली सर्व अधिकाऱ्यांची बैठक
उल्हासनगर : शहाड पुल दूरस्तीमुळे पूल पुढील २१ दिवस बंद राहणार असल्याने, शहरांत वाहतूक कोंडी निर्माण झाली. यातून तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी राज्य व महापालिका बांधकाम विभाग, राज्य परिवहन, महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्याची समन्वय बैठक सोमवारी बोलाविली होती.
उल्हासनगर शहाड पुल रस्त्याच्या दुरस्तीचे काम सुरू झाल्याने, शहरातील शांतीनगर ते १७ सेकशन रस्ता, डॉल्फिन मार्गे शहाड पूल रस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाली. शहरातील वाहतूक कोंडीवर व शहाड पूल दूरस्ती बाबत तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी विविध अधिकाऱ्याची समन्वय बैठक सोमवारी बोलाविली होती.
बैठकीत महामार्ग विभागाच्या ज्योती शिंदे, अभियंता सविता सांगले, गौरव सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) चे अभियंता प्रशांत मानकर, महापालिका शहर अभियंता नीलेश शिरसाटे, संदीप जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश शिरसाटे, राज्य परिवहनचे उप-वाहतूक अधिकारी ठाणे धनंजय शिंदे, कल्याण डेपो व्यवस्थापक महेश भोर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महामार्ग विभागाच्या अभियंता ज्योती शिंदे यांनी पूल रस्त्याचे दूरस्ती काम सुरू झाल्याची माहिती यावेळी दिली. तसेच सर्व उपाययोजना करणार असल्याच्या म्हणाल्या. पूल रस्त्याचे रात्रंदिवस काम सुरू राहून विभागाचे अभियंते २४ तास तैनात ठेवण्यात आले.
बैठकीत शहाड पुलाखालून वाहने चालवण्यावर सहमती झाली असून राज्य परिवहनच्या बस आणि शालेय बस शहाड- ते डॉल्फिन रोड मार्गे काजल पेट्रोल पंप, हीराघाट या मार्गावरून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार कुमार आयलानी यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत मानकर यांना अंबरनाथ बदलापूर रोडवरील स्मशान चौकाची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.