ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रवीण दरेकरांना फटका, लोकलने केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 02:29 IST2020-01-25T02:28:10+5:302020-01-25T02:29:00+5:30
मेट्रोच्या कामामुळे ठाण्यात होत असलेली वाहतुक कोंडी ठाणेकरांना नित्याचीच बनली असताना या कोंडीचा फटका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही बसला आहे.

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रवीण दरेकरांना फटका, लोकलने केला प्रवास
ठाणे - मेट्रोच्या कामामुळे ठाण्यात होत असलेली वाहतुक कोंडी ठाणेकरांना नित्याचीच बनली असताना या कोंडीचा फटका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी दरेकर हे दिव्यात एका कार्यक्रमास जात होते.
त्यासाठी त्यांच्यासोबत शासकिय गाड्यांचा ताफा होता, त्यातच दिव्यात जाताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने त्यांनी शासकीय ताफा सोडून ठाणे ते दिवा थेट लोकल ट्रेनने प्रवास केला. दिवा येथे आयोजीत अखंड कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमाला दरेकर व आमदार निरंजन डावखरे निघाले होते. कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहण्यासाठी दरेकर आणि डावखरे यांनी ऐन गर्दीच्या वेळी साडे सातच्या सुमारास ठाणे स्थानकातुन टिटवाळा लोकलने ठाणे ते दिवा असा प्रवास केला.या लोकल प्रवासाबाबत आ.निरंजन डावखरे यांनी दूजोरा दिला.