शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

वाहतूककोंडी मुक्त शहर आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- विवेक फणसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 21:06 IST

कायदा सुव्यवस्थेबरोबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

ठळक मुद्देमंगळवारी दुपारी घेतली ठाण्याची सूत्रेप्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर भरसर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला सिंग यांना निरोप

ठाणे : वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका करणे, कायदा सुव्यवस्थेबरोबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली. मावळते आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडून मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास २२ वे पोलीस आयुक्त म्हणून ठाण्याची सूत्रे त्यांनी घेतली. ठाण्यात आधी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यामुळे परिचित असलेल्या ठाण्याची जबाबदारी मोठी आहे. ती प्रामाणिक आणि चोखपणे काम करून पार पाडणार असल्याचे ते म्हणाले. ठाण्यात गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेची अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे ठाणेकरांना चांगली सेवा देण्यात पोलीस बांधील राहतील. कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध आणि अन्वेषण तसेच वाहतूककोंडीतून ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांची मुक्तता होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. पोलिसांच्या कल्याणासाठीही चांगल्या योजना राबविण्यात येतील. ठाण्यात सायबर, आॅनलाईन फसवणूक आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिकच्या वापरावर नागरिकांचा अधिक भर असल्यामुळे त्यादृष्टीने पोलीस सक्षम आणि नागरिकांमध्ये जागृकता वाढविणार भर दिला जाईल. ठाणेच नव्हे तर राज्यभरात मराठा मोर्चा आणि आंदोलनाची परिस्थिती पोलिसांनी अत्यंत संयमीपणे हाताळली. नागरिकांचेही सहकार्य लाभल्यास पोलिसांना गुन्हेगारांचा बिमोड करणे सोपे होईल. काही वर्षांपूर्वी ठाण्यात अतिरेकी पकडले गेल्याच्या पार्श्वभूमीवर एटीएस आणि स्थानिक पोलीस यांच्यातही समन्वय ठेवूनच काम केले जाईल. गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच कोणतेही आणि कसलेही गुन्हेगार असले तर कठोर कारवाई केली जाईल आणि सर्व सामान्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली........................................ठाणे पोलीस यापुढेही चांगले काम करतील- परमवीर सिंगफणसाळकर यांना ठाण्याची सूत्रे सुपूर्द केल्यानंतर राज्य मुख्यालयात कायदा सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली झालेले मावळते आयुक्त परमवीर सिंग म्हणाले, मुंबई पोलीस आयुक्त पदापेक्षाही राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ठाणे पोलिसांनी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात अगदी आंतरराष्टÑीय पातळीवरील काम केले. मग ते इफेड्रिन असो की, कॉल सेंटरमधील फसवणूक किंवा पेट्रोल भेसळीचा भंडाफोड अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. यापुढे आपल्या पश्चातही फणसाळकर यांच्या अधिपत्याखाली ठाणे पोलीस अशीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही सिंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली