शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

मराठी पाट्यांसदर्भात आज मनसेचा कामगार आयुक्तांना घेराव, दिला शेवटचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:37 PM

आज दुपारी कामगार आयुक्तांना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आयुक्त कार्यालयात उपोषणाला बसण्याचा शेवटचा इशारा दिला.

ठळक मुद्दे कामगार आयुक्तांना घेराव घालून मराठी पाट्यांंसंदर्भात शेवटचा इशारा५ जानेवारी २०१८ पासून सर्व महाराष्ट्र सैनिक धरणे आंदोलन करून उपोषणाला बसण्याचा इशारा नोटिशीनंतर मराठी पाट्या लावल्या गेल्यास कामगार आयुक्तांचा सत्कार

ठाणे: आज मनसैनिकांनी कामगार आयुक्तांना घेराव घालून मराठी पाट्यांंसंदर्भात शेवटचा इशारा दिला. दुकानांबाहेर मराठी पाट्या लागल्या गेल्या नाही तर ५ जानेवारी २०१८ पासून सर्व महाराष्ट्र सैनिक याच आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करून उपोषणाला बसतील असे या इशाºयात त्यांनी म्हटले.       १५ दिवसांपुर्वी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर मनसे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी दुकानाबाहेर मराठी पाट्या लावण्याचे पत्र दिले. ठाण्यात मनसे पदाधिकाºयांनी शहरातील ५०० दुकानदारांना पत्र दिले आणि १५ दिवसांची मुदत देण्यात आली. दुकानांबाहेर मराठी पाट्या न लावल्यास खळ्ळखट्याकवर ठाम राहू असे मनसेकडून सांगण्यात आले. त्याआधी कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल असा इशारा ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी मनसेचे जवळपास ७० पदाधिकारी-कार्यकर्ते कामगार आयुक्तांना भेटण्यास गेले होते. या भेटीत एका महिन्याच्या आत ठाणे शहरासह, संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पाट्या मराठीत झाल्या नाहीत व मुजोरांवर कारवाई करण्यात आली नाही तर आजपासून एका महिन्यानंतर महाराष्ट्र सैनिक याच आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करून उपोषणाला बसतील असे कडक शब्दांत कामगार आयुक्तांना सांगत यावेळी कर्नाटकच्या आधारकार्डची त्यांना प्रत दाखवून महाराष्ट्रात आपल्या भाषेचा अभिमान का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तुम्ही मराठी अधिकारी आहात, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, त्यामुळे शहरासह, जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याच्या नोटीसा द्या असे कामगार आयुक्त देशपांडे यांना मनसे पदाधिकाºयांनी सांगितले. तसेच, तुमच्या नोटीशीनंतर मराठी पाट्या लावल्या गेल्यास आम्ही स्वत: येऊन तुमचा सत्कार करु असे ठाणे जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी कोपरीतील उत्पादन शुल्क अधिकाºयांचा सत्कार केल्याचे उदाहरण दिले. यावेळी कामगार आयुक्तांनी नोटीसा देण्यात येईल असे आश्वासन मनसे पदाधिकाºयांना सांगण्यात आले. तसेच, गुमास्ता परवान्याच्या नुतनीकरणावेळी त्या दुकानाच्या फलकाचे छायाचित्र जोडले जावे असा उपाय देखील मनसेने त्यांना सुचविला. यावेळी जाधव यांच्यासह मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, ठाणे शहराचे उपाध्यक्ष रवी मोरे, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, उपशहर अध्यक्ष विश्वजीत जाधव, महिला ठाणे शहर अध्यक्ष रोहिणी निंबाळकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई