Otherwise use vulgar language - Thackeray's MNS functionary | मराठी पाट्या न लावल्यास खळ्ळखट्याकची भाषा वापरु - ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांचा इशारा

ठळक मुद्देशहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्रठाणे पोलिसांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल - अविनाश जाधव

ठाणे: ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी शहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र आणि त्यात १५ दिवसांची मुदत दिली आहे. मराठी पाट्यांसाठी मनसे पदाधिकाºयांकडून हिंसक आंदोलन होईल या भितीने ठाणे पोलीसांनी त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. परंतू दिलेल्या मुदतीत मराठी पाट्या न लावल्यास मनसे पोलीसांच्या नोटीसांना नेहमीप्रमाणे न जुमानता पुन्हा एकदा खळ्ळखट्याक होणार इशारा ठाणे मनसेने दिला आहे.
      १५ दिवसांपुर्वी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर मनसे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी दुकानाबाहेर मराठी पाट्या लावण्याचे पत्र दिले. ठाण्यात मनसे पदाधिकाºयांनी शहरातील ५०० दुकानदारांना पत्र दिले आणि १५ दिवसांची मुदत देण्यात आली. एल्फिस्टन येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मनसेने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाºयांनी दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून आंदोलन करण्याची भिती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी पोलिसांनी मनसेच्या २५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी आंदोलने करू नयेत, असे त्यात बजावण्यात आले असून त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यात देण्यात आला आहे. परंतू नेहमीप्रमाणे मनसे पोलीसांच्या नोटीशींना जुमानणार नाही. १५ दिवसांत दुकानाबाहेर मराठी पाट्या न दिसल्यास खळ्खट्याकची भाषा वापरण्यात येईल. त्या आधी कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल असा इशारा ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.