भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी

By नितीन पंडित | Updated: April 20, 2023 18:25 IST2023-04-20T18:25:14+5:302023-04-20T18:25:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: भिवंडीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एकाच दिवसात तब्बल तीन वाहनांची चोरी झाल्याचे ...

Three vehicles stolen in a single day in Bhiwandi | भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी

भिवंडीत एकाच दिवसात तीन वाहनांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एकाच दिवसात तब्बल तीन वाहनांची चोरी झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

        पहिल्या घटनेत महेशकुमार छत्रकुमार सिलवार वय ५२ वर्ष राहणार मानसरोवर भिवंडी यांनी त्यांचे मोटरसायकल मानसरोवर येथे पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली या प्रकरणी महेश कुमार यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

         दुसऱ्या घटनेत वेळेगाव येथील राहणारे साजन प्रकाश भोईर वय २६ वर्ष यांनी त्यांची मोटरसायकल बुधवारी ओळीगाव येथील सागर कॉम्प्लेक्स येथे पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली याप्रकरणी साजन यांनी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

          तिसऱ्या घटनेत वाहन चालक म्हणून काम करणारे इम्तियाज असगर हुसेन बेलीम वय ४० वर्ष राहणार धामणकर नाका यांनी १० एप्रिल सायंकाळी सहा ते १२ एप्रिल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील टाटा एस टेम्पो अजंटा कंपाऊंड येथे पार्क करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला आहे याप्रकरणी इम्तियाज यांनी बुधवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three vehicles stolen in a single day in Bhiwandi

टॅग्स :theftचोरी