अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या तीन हजार वृक्षांवर कुऱ्हाड; पालिकेने मागविल्या हरकती, सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:29 IST2026-03-10T09:29:24+5:302026-03-10T09:29:52+5:30

मेट्रोच्या आड येणाऱ्या सुमारे तीन हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Three thousand trees coming in the way of the internal metro to be felled; Municipality seeks objections, suggestions | अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या तीन हजार वृक्षांवर कुऱ्हाड; पालिकेने मागविल्या हरकती, सूचना

अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या तीन हजार वृक्षांवर कुऱ्हाड; पालिकेने मागविल्या हरकती, सूचना

ठाणे : एकीकडे सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असतानाच या ठिकाणी आड येणाऱ्या वृक्षांची कत्तल करून घोडबंदर रोड उजाड करण्यात आला. त्यातच आता अंतर्गत मेट्रोच्या आड येणाऱ्या सुमारे तीन हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जाहीर सूचना ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने प्रसिद्ध केली आहे. या वृक्षतोडीला प्रचंड विरोध होत आहे.

वर्तुळाकार मेट्रो २०२९ पर्यंत ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल. प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी असून, २६ किमी उन्नत व तीन किलोमीटर भूमिगत मार्ग असेल. दरम्यान, प्रकल्पामुळे  फॉक्सटेल पामसह जांभूळ, सप्तपर्णी, बदाम, कडंब, सोनमोहर, पिंपळ, गुलमोहर, करंज, आंबा, शेवगा, नारळ, पेरू, वड, काळा उंबर, रामफळ, आदींसह देशी व विदेशी प्रजातींच्या झाडांवर कुऱ्हाड कोसळेल.

अशी धावणार मेट्रो 

रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्यनगर बसडेपो, शिवाजीनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकूम नाका, बाळकूमपाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे अशी स्थानकांची आखणी केली आहे. तसेच, शहरातील १३२ इमारतींच्या खालून ही मेट्रो जाईल. 

पालिकेने मागविल्या हरकती, सूचना :  हरकती, सूचना मागविल्या असून  ३,२२४ वृक्ष बाधित होतील. २,६९३ वृक्षांचे पुनर्रोपण होईल.

वृक्षसंपदा संकटात

उपवन तलावाजवळची वृक्षसंपदा नष्ट होणार आहे. वागळे इस्टेट सर्कल, रायलादेवी, लोकमान्य, शिवाईनगर  या भागातील वृक्षांचा त्यात समावेश आहे.

Web Title : ठाणे मेट्रो: हजारों पेड़ों पर खतरा; आपत्तियां आमंत्रित।

Web Summary : ठाणे की आंतरिक मेट्रो परियोजना से लगभग 3,000 पेड़ों पर खतरा मंडरा रहा है। ठाणे नगर निगम ने आपत्तियां आमंत्रित की हैं। 2029 तक पूरा होने वाला यह प्रोजेक्ट, एलिवेटेड और भूमिगत खंडों को मिलाकर, विभिन्न पेड़ प्रजातियों और मार्गों को प्रभावित करेगा, जिससे विरोध शुरू हो गया है।

Web Title : Thane Metro: Thousands of Trees Face Axe; Objections Invited.

Web Summary : Thane's internal metro project threatens approximately 3,000 trees. The Thane Municipal Corporation has invited objections. The project, slated for completion by 2029, includes elevated and underground sections, impacting various tree species and properties along its route, sparking opposition.

टॅग्स :Metroमेट्रो