रेंटलच्या घरांचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:45 AM2017-08-01T02:45:13+5:302017-08-01T02:45:13+5:30

निकृष्ट बांधकामामुळे एमएमआरडीएने बांधलेल्या रेंटलच्या घरांचे चार वर्षांत तीनतेरा वाजले असून त्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

Three rooms of rentals | रेंटलच्या घरांचे तीनतेरा

रेंटलच्या घरांचे तीनतेरा

Next

ठाणे : निकृष्ट बांधकामामुळे एमएमआरडीएने बांधलेल्या रेंटलच्या घरांचे चार वर्षांत तीनतेरा वाजले असून त्यांच्या दुरुस्तीवर महापालिकेने दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च प्रकल्पातील १२ ठिकाणांवर झाला आहे. वाढीव एफएसआय पदरी पाडून घेणाºया विकासकांनी रेंटलची ही घरे निकृष्ट बांधल्याचा आरोप होऊ लागला असून याप्रकरणी एमएमआरडीएच्या तत्कालीन दोषी अधिकाºयांसह विकासकांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची मागणी जोर धरते आहे.
ठामपा हद्दीत एमएमआरडीएच्या माध्यमातून रेंटलची घरे बांधण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भाडेपट्ट्यावरील घरांची उभारणी व्हावी, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने वाढीव चटईक्षेत्राची महत्त्वाकांक्षी योजना पुढे आणली. या माध्यमातून चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर तब्बल चार चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करून बांधकाम करण्याची मुभा खासगी विकसकांना देण्यात आली. या वाढीव चटईक्षेत्राच्या मोबदल्यात बिल्डरने भाडेपट्ट्यावर घरांची उभारणी करावी, असे ठरवण्यात आले. ठाणे शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून तब्बल १२ ठिकाणी भाडेपट्टा योजनेद्वारे घरउभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या बांधकामांना बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी ठाणे महापालिका हे नियोजन प्राधिकरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार, एमएमआरडीएने ही घरे बांधून २०१३ च्या सुमारास ती पालिकेच्या ताब्यात दिली. ती ताब्यात देताना लिफ्ट, जिने, आगप्रतिबंधक योजना, सोलर, इलेक्ट्रिक सबस्टेशन, आदींसह इतर सर्व सुविधा पुरवण्यात आल्याचे ताबा प्रमाणपत्रही पालिकेला देण्यात आले होते. परंतु,अवघ्या चारच वर्षांत यातील बहुतेक इमारती निकृष्ट दर्जाच्या ठरल्या आहेत.
ठाणे महापालिकेस रेंटलच्या माध्यमातून आतापर्यंत ३२६७ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. शहरातील रस्ते रु ंदीकरण तसेच इतर विकास प्रकल्पांमधील विस्थापितांना ही घरे रेंटल स्वरूपात देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यानुसार धोकादायक इमारतींमधील २२७२ बाधितांना, तर रस्ता रु ंदीकरणातील ९३४ बाधितांना आतापर्यंत ती वितरित करण्यात आली आहेत. असे असले तरी त्यांची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्र ारी सातत्याने पुढे येत आहे.
यामुळे वाढीव चटईक्षेत्राचा लाभ घेऊन उभारलेल्या या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे पत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी महापालिका आयुक्तांना पाठवल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वर्तकनगर या अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात चार चटईक्षेत्राचा वापर करून उभारलेल्या दोस्ती विहार या नावाजलेल्या प्रकल्पातील भाडेपट्ट्यावर घरांच्या दुरु स्तीसाठी महापालिकेस पहिल्याच वर्षात तब्बल ५० लाखांपेक्षा अधिक करावा लागला आहे. तसेच प्रत्येक वर्षी या प्रकल्पासह मानपाडा येथील प्रकल्पावरदेखील खर्च केला असून आतापर्यंत विविध स्वरूपांच्या कामांवर तब्बल २ कोटी ८१ लाख ६२ हजार ३५४ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या १२ प्रकल्पांमधील रेंटलवर हस्तांतरित झालेल्या घरांची महापालिकेने तपासणी करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी वैती यांनी केली आहे.

Web Title: Three rooms of rentals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.