शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:44 IST

पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले...

हितेन नाईक -पालघर : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री पाठलाग केल्याने घाबरून पळताना अपघात होऊन तिघांचा बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाच्या नावावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या तरुणांचा पाठलाग करणारे लोहमार्ग पोलिस, आरपीएफ पोलिस होते की पालघर शहर पोलिस होते? याबाबत कुठलीच माहिती समोर आलेली नाही. या घटनेप्रकरणी आकस्मिक गुन्ह्याची नोंद पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. स्वप्निल शैलेश पलांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी या तिघांची नावे आहेत. 

पोलिस काय म्हणाले?इफ्तारी करून तिघे विरेंद्रनगर येथील घरी जाताना जैन मंदिराजवळील एका भिंतीमधील फटीमधून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना या तिघांचा अपघात झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. तपासासाठी सीसीटीव्ही तपासले जात असल्याचेही ते म्हणाले. तर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगवले यांनी माहिती दिली, रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीने या तिघांना उडविल्याचे मालगाडीच्या लोको पायलटने सांगितले.

मृतांच्या नातेवाइकांची मागणी काय?हे तिन्ही तरुण एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात सहभागी होती का? त्यांचा पाठलाग कोणते पोलिस आणि कशासाठी करीत होते? याची माहिती समोर यावी, अशी मागणी एका मृताची बहीण दर्शना सुरेश सिंग यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Three Killed by Train in Palghar; Police Chase Alleged

Web Summary : Three young men died near Palghar's Jain temple after being hit by a train. Relatives allege a police chase caused the accident. Police are investigating, examining CCTV footage, and conducting post-mortems. The victims were identified as Swapnil Palande, Kunal Dubla, and Afroz Sheikh.
टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यूpalgharपालघर