भिवंडीत एकाच दिवसात वाहन अपघाताच्या तीन घटना ; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

By नितीन पंडित | Updated: February 17, 2023 17:28 IST2023-02-17T17:28:36+5:302023-02-17T17:28:43+5:30

भिवंडी एकाच दिवसात वाहन अपघातांच्या तीन वेगवेगळ्या घटना गुरुवारी घडल्या असून या तीन घटनांमध्ये तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Three incidents of vehicle accidents in one day in Bhiwandi; Unfortunate death of three youths | भिवंडीत एकाच दिवसात वाहन अपघाताच्या तीन घटना ; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडीत एकाच दिवसात वाहन अपघाताच्या तीन घटना ; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी:- भिवंडी एकाच दिवसात वाहन अपघातांच्या तीन वेगवेगळ्या घटना गुरुवारी घडल्या असून या तीन घटनांमध्ये तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

दर्गा रोड परिसरात राहणारा नसीरउद्दीन जफरउद्दीन सिद्दीकी वय २५ हा आपल्या बुलेट वरून मुंबई येथे कामावर जात असताना असताना तो मानकोली नाका येथे आला असता त्याच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी मोहम्मद सलिम फारूकी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंटेनर चालक सुनिल चनकि यादव रा.उत्तरप्रदेश यास अटक करण्यात आली आहे .

तर दुसऱ्या घटनेत नाशिक अमृतधाम परिसरात राहणारा प्रविण हरीरामजी मोट पुरोहीत वय २२ हा आपल्या दुचाकीवरून कामा निमित्त मुंबईच्या दिशेने दुपारी पाऊणे बारा वाजताच्या सुमारास जात असताना खारेगाव खाडीपुला दरम्यान पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवीणचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात कंटेनर वरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना शानदार मार्केट समोरील रस्त्यावर घडली. येथे ऍक्टिव्हा वरून शांतीनगर परिसरातील एहतेशाम लाल मोहम्मद अन्सारी वय २० जात असताना चाविंद्रा कडून वंजारपट्टी च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रेलरने दुचाकीस धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात कंटेनरच्या अज्ञात चालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .

Web Title: Three incidents of vehicle accidents in one day in Bhiwandi; Unfortunate death of three youths