ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:29 IST2021-06-02T21:27:41+5:302021-06-02T21:29:28+5:30

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाºया सुनिल जैन (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे.

Three arrested for operating high profile sex racket in Thane | ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना अटक

मॉडेलिंग करणाºया दोन तरुणींची सुटका

ठळक मुद्देमॉडेलिंग करणाºया दोन तरुणींची सुटकाठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाºया सुनिल जैन (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून मॉडेलिंग करणाºया दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी येथे एका इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकाणी यांच्या पथकाने या फ्लॅटवर बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी फ्लॅट मध्ये मॉडेलिंग करणाºया दोन ३० वर्षीय तरु णी आढळून आल्या. त्यांना काही पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात होता. यातून या दोन्ही पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. हा व्यवसाय चालविणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली असून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हे ग्राहकांशी फोन वरून संपर्क साधून त्यांना हायप्रोफाईन तरुणी शरीर संबंधासाठी पुरवित होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. दोन्ही मॉडेल तरु णींची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुटका केलेल्या मॉडेल तरुणींनी तेलगू चित्रपटांसह काही वेब मालिकांमध्येही भूमीका केल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Three arrested for operating high profile sex racket in Thane