शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

शेजाऱ्याशी भांडणातून चिमुरडीचा केला खून, दहावीच्या विद्यार्थिनीचे निर्घृण कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:35 AM

शेजारी राहत असलेल्या नातलगाशी होत असलेल्या वादातून अवघ्या दोन वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील तुळई येथे शनिवारी घडली.

मुरबाड/टोकावडे : शेजारी राहत असलेल्या नातलगाशी होत असलेल्या वादातून अवघ्या दोन वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील तुळई येथे शनिवारी घडली. आरोपी मुलगीही १५ वर्षांची असून, तिला पोलिसांनी अटक केली आहे. मुरबाड तालुक्यातील तुळई गावातील अनुष्का जाधव ही दोन वर्षीय मुलगी शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती.बरीच शोधाशोध केल्यानंतर मुलीचे पालक भाऊ जाधव यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शनिवारी रात्रीच या गावात जाऊन शोधमोहीम सुरू केली असता, तिच्या शेजारील मुलीकडे अनुष्का दुपारी दिसल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, अनुष्का सर्वात शेवटी शेजारी मुलीकडेच दिसल्याची खातरजमा झाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक विकास निकम यांनी शेजारील मुलीचे घर गाठले. त्या वेळी आरोपी मुलगी गाढ झोपेत होती. तिला विचारणा केली असता, तिच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तिच्या घराची झडती घेतली असता, घराच्या पोटमाळ्यावर अनुष्काचा मृतदेह मिळाला. त्यानंतर, पोलिसी खाक्या दाखविताच तिने अनुष्काला आपणच गळा आवळून ठार केल्याची कबुली दिली.आरोपी मुलगी अवघी १५ वर्षांची असून, ती दहावीची विद्यार्थिनी आहे. ती आणि मृत अनुष्काचे कुटुंब हे जवळचे नातलग आहेत. त्यांच्यात दिवाळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्या रागातूनच अनुष्काचा खून केल्याची कबुली तिने दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे व पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.>आरोपी विद्यार्थिनीची आई आणि मृत अनुष्काची आई यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. याच रागातून तिने अनुष्काचा खून केला. आरोपी बालगुन्हेगार आहे. तिला सोमवारी भिवंडी न्यायालयासमोर हजर केले जाईल.- अजय वसावे,पोलीस निरीक्षक, मुरबाड