ठाण्यात चक्क महसूलच्या अधिकारी महिलेचीच चोरटयांनी बस प्रवासामध्ये लांबविली पर्स

By जितेंद्र कालेकर | Updated: October 18, 2018 20:43 IST2018-10-18T20:36:44+5:302018-10-18T20:43:19+5:30

बसमधून प्रवास करणाऱ्या महसूल विभागाच्या एका अधिकारी महिलेची पर्स लांबविणा-या जमीर दाबीलकर आणि निशाण सय्यद या दोन चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

Thieves caught who stole purse of woman revenue officer in Thane | ठाण्यात चक्क महसूलच्या अधिकारी महिलेचीच चोरटयांनी बस प्रवासामध्ये लांबविली पर्स

कापूरबावडी पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्दे दोघेही चोरटे जेरबंदकापूरबावडी पोलिसांची कामगिरीपर्स, रोकड आणि एटीएम कार्डही हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बसमध्ये पाकिटमारी तसेच पर्स हिसकावून पळणा-या जमीर सैफुद्दीन दाबीलकर (३२, रा. मुंब्रा) आणि निशाण हैदर अहमद हुसेन सय्यद (४०, कुर्ला, मुंबई) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून एका अधिकारी महिलेची पर्सही हस्तगत करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील प्राजक्ता भड (रा. हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ठाणे) या विस्तार अधिकारी महिलेची वाघबिळ ते भार्इंदर बस प्रवासामध्ये आरमॉलजवळ पर्स चोरीस गेल्याची तक्रार १६ आॅक्टोंबर रोजी दुपारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याच तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे, प्रदीप भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, हवालदार अशोक कदम, नाईक अनिल जाधव, कॉन्स्टेबल अमोल कटाळे आणि निखील जाधव या शोध पथकाने साध्या वेषामध्ये मानपाडा बसथांबा येथे त्याचदिवशी सापळा लावला. रात्री ९ वा. च्या सुमारास जमीर आणि निशाण या संशयास्पदरित्या वावरणाºया दोघांची चौकशी करण्यात आली. उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना बोलते केल्यानंतर त्यांनी या महिलेची पर्स चोरल्याची कबूली दिली. या पर्ससह त्यांचे एटीएम कार्ड आणि दीड हजारांची रोकड असा ऐवजही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्यांनी याच भागात आणखी किती ठिकाणी पाकिटमारी केली, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

Web Title: Thieves caught who stole purse of woman revenue officer in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.