भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

By धीरज परब | Updated: July 13, 2023 20:14 IST2023-07-13T20:13:37+5:302023-07-13T20:14:12+5:30

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.

Thieves broke into five shops in Bhayander | भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

मीरारोड -  भाईंदर पश्चिमेस मॅक्सस मॉल परिसरातली ५ दुकाने गुरुवारच्या पहाटे चोरट्यानी फोडल्याने खळबळ माजली आहे.  गुरुवारी सकाळी पुष्पा निकेतन इमारती मधील पाच दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यात संगणक, किराणा, लॅब आणि हार्डवेअर स्टोअर च्या दुकानांचा समावेश आहे . हार्डवेअर दुकानाच्या गल्ल्यातून एकोणीसशे रुपयांची रोख चोरली आहे. 

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यास सुरवात केली आहे. फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेत. दुकानदारांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात असले तरी एकाचवेळी ५ दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. 

 

Web Title: Thieves broke into five shops in Bhayander